भारतीय संघाचा स्टार क्रिकेटपटू हार्दिक पांड्या व त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक यांनी काही दिवसांपूर्वीच विभक्त होत असल्याची घोषणा केली. दोघांमधील घटस्फोटाच्या चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरु होत्या आणि अखेर या चर्चा खऱ्या ठरल्या आहेत. त्यांच्या नात्याबद्दल सोशल मीडियासह इतर सर्व प्रसार माध्यमांमध्ये अनेक चर्चा होत होत्या. मात्र या दोघांनी त्याबद्दल अधिकृतपणे भाष्य केलं नव्हतं. मात्र आता त्यांनी यावर स्पष्टपणे सांगितले आहे. गुरुवार, १८ जुलै रोजी त्यांनी एकमेकांपासून विभक्त होत असल्याची पोस्ट शेअर केली. हार्दिक व नताशा यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर एकमेकांपासून विभक्त होत असल्याचे सांगितले.
घटस्फोटाची घोषणा करण्यापूर्वीच नताशा मुलगा अगस्त्यबरोबर सर्बियाला गेली होती. दोघेही सर्बियाला गेल्यानंतरच त्यांच्या घटस्फोटाची घोषणा करण्यात आली. नताशाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून हार्दिकपासून घटस्फोट घेतल्यानंतर ती जगत असलेल्या आयुष्याची झलक दाखववली आहे. हार्दिक श्रीलंकेच्या दौऱ्यावर गेला असताना, नताशा तिच्या मुलाबरोबर तिच्या मूळ गावी सर्बियामध्ये आहे.

नताशाने मुलगा अगस्त्याबरोबरचे अनेक फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती तिच्या मुलाला फिरायला घेऊन गेली आहे आणि खूप मजा करत आहे. फोटोंमध्ये माय-लेक दोघेही खूप आनंदी दिसत आहेत. उद्यानात अनेक प्राणी पाहिल्यानंतर अगस्त्यला खूप आनंद झाला असल्याचे या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे. घटस्फोटानंतर नताशा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि तिच्या आयुष्यातील प्रत्येक अपडेट ती चाहत्यांबरोबर शेअर करत असते. अशातच तिच्या या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
आणखी वाचा – Video : थायलंडमध्ये अक्षरा-अधिपतीचा हनिमून, समुद्रकिनारी जोडप्याचा रोमान्स, व्हिडीओ पाहून प्रेक्षकही भारावले
दरम्यान, नताशा एका नाईट क्लबमध्ये हार्दिकला भेटली होती. यानंतर दोघांचे नाते काही वेळातच घट्ट झाले. दोघांनी ३१ मे २०२० रोजी त्यांच्या नात्याचा खुलासा केला. हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविकनं ३० जुलै २०२० रोजी अगस्त्य नावाच्या मुलाला जन्म दिला. नंतर १४ फेब्रुवारी २०२३ रोजी उदयपूर येथे हिंदू रितीरिवाजांनुसार त्यांचे लग्न झाले होते.