बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. आजवर तिने अनेक हिंदी व हॉलिवूड चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका केल्या आहेत. ती अभिनेता अभिषेक बच्चनबरोबर लग्नबंधनात अडकली होती. त्यांना आराध्या नावाची मुलगीदेखील आहे. तिघेही अनेकदा एकत्रितपणे मीडियासमोर येतात. ऐश्वर्या आजपर्यंत नेहमी अमिताभ बच्चन, जया बच्चन यांच्याबरोबर दिसायची. मात्र काही दिवसांपूर्वी बच्चन कुटुंबामध्ये काहीतरी समस्या असल्याचे अंदाज बांधण्यात आले आहे. अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नात ही गोष्ट प्रकर्षाने दिसून आली. (aishwarya rai life )
सध्या ऐश्वर्या व बच्चन कुटुंबामध्ये अबोला आल्याचे वृत्त आहे. राधिका व अनंत यांच्या लग्नात ऐश्वर्या व बच्चन कुटुंब हे वेगवेगळे आले होते. त्यानंतर अभिनेत्रीचे कुटुंबाबरोबरचे संबंध संपल्याच्या चर्चा सुरु झाल्या. मात्र त्यांच्यामध्ये हा दुरावा नक्की कोणामुळे आला? हा प्रश्न आता सगळ्यांनाच पडला आहे. बच्चन कुटुंबातील मुलगी श्वेता बच्चन ही लाडकी आहे. तिच्यासाठी अमिताभ व जया हे नेहमी खंबीरपणे उभे असलेले दिसतात. काही दिवसांपूर्वी अमिताभ यांनी केलेल्या पोस्टमध्ये त्यांची संपूर्ण संपत्ती ही अभिषेक व श्वेता यांच्यामध्ये समान वाटणी होणार आहे.तसेच श्वेता सध्या पती निखिल नंदापासून वेगळी बच्चन यांच्या घरातच रहात आहे.
तसेच मिळालेल्या माहितीनुसार, श्वेताचे घरी राहणे ऐश्वर्याला आवडत नाही. गेल्या वर्षी अमिताभ यांनी त्यांचा प्रतीक्षा बंगला हा ऐश्वर्याच्या नावे केला होता. हेदेखील ऐश्वर्याला आवडलं नाही आणि तेव्हापासूनच त्यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडली, असेही सांगितले जात आहे. अभिषेक वगळता ऐश्वर्याचे त्या घरात कोणाशीही बोलणं नाही व ती आता सासरी न राहता माहेरी राहत असल्याचेही समोर आले आहे.
आणखी वाचा – घटस्फोटानंतर असं जीवन जगत आहे हार्दिक पांड्याची पूर्वश्रमीची पत्नी, कसा भागवते खर्च?
त्यामुळे आता ऐश्वर्याबरोबर संबंध बिघडण्याला नणंद श्वेता जबाबदार आहे असेच म्हंटले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, श्वेतामुळे ऐश्वर्याने सासू-सासरे अमिताभ व जया यांच्याबरोबर बोलणं बंद केले आहे. अंबानी यांच्या लग्नात ऐश्वर्याने कोणबरोबरही बोलणं ठेवलं नाही. याआधी अनेकदा श्वेता व ऐश्वर्या या मीडियासमोर एकत्रित पोज देताना दिसल्या आहेत. मात्र यावेळीही त्यांच्यामध्ये असलेला दुरावा दिसून येत होताच.