सध्या नाना पाटेकर यांच्या एका व्हिडीओने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. वाराणसी येथे ‘जर्नी’ चित्रपटाचं चित्रीकरण करत असताना घडलेला एक प्रसंग सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आहे. चित्रीकरणादरम्यान एका इसमाला नानांनी जोरात कानशिलात लावली असल्याचा तो व्हिडीओ नेटकऱ्यांच्या तावडीत सापडला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर पसरताच नाना टीकेचे धनी झाले आहेत. (Nana Patekar Viral Video)
नानांचा एक चाहता त्यांच्याबरोबर सेल्फी काढण्यासाठी पुढे आला. त्यावेळी नाना चित्रीकरण करत होते तेव्हा त्यांचा हा चाहता मध्येच आला आणि त्यांच्या बाजूला उभा राहून फोटो काढू लागला. तेव्हा नानांना चाहत्याचा प्रचंड राग आला आणि त्यांनी रागाच्याभरात त्या चाहत्याला जोरदार टपली मारली. हा व्हिडीओ जमलेल्या जमावापैकी कोणीतरी कैद केला आणि सोशल मीडियावरून पोस्टही केला. व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांनी नानांवर नाराजी व्यक्त केली असून त्यांच्यावर विविध माध्यमांमधून टीका करण्यात येत आहे.
या टीकेच्या व्हायरल व्हिडिओनंतर नानांची बाजू सांभाळणारा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावरून शेअर करण्यात आला आहे. अभिनेता हेमंत खैर याने हा व्हिडीओ पोस्ट केला असून या व्हिडिओमध्ये जर्नी चित्रपटाची टीम पाहायला मिळतेय. या व्हिडिओत नाना स्वतःच्या हातांनी सहकलाकारांना पाणी पाजत आहेत. व्हिडिओमध्ये मराठमोळी अभिनेत्री श्रुती मराठे व इतर कलाकार दिसत आहेत. या व्हिडिओला ‘बाप म्हणून आमची काळजी घेताना त्याने रील व रिअल यातील रेषा पुसट केली’ असं कॅप्शन देण्यात आलं आहे.

या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करत संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. या व्हिडिओवर श्रुती मराठेने कमेंट करत म्हटलं आहे की, “ते नेहमीचं आमची काळजी घेत असतात” असं म्हटलं आहे. तर नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर कमेंट करत त्यांना ट्रोलही केलं आहे. एका नेटकऱ्याने कमेंट करत म्हटलं आहे की, “मागील व्हायरल व्हिडिओ झाकण्यासाठी हा एक स्टंट आहे”.