मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री तेजस्विनी पंडित तिच्या अभिनय व सौंदर्यासाठी ओळखली जाते. ‘तू ही रे’, ‘येरे येरे पैसा’, ‘अगं बाई अरेच्चा’, ‘१०० डेज’ यांसारख्या चित्रपट व मालिकांमध्ये ती झळकली. शिवाय, ‘अनुराधा’, ‘समांतर’ व ‘रानबाझार’ या वेबसीरिजमधून तिने उत्तम भूमिका साकारत प्रेक्षकांचं मने जिंकली आहे. केवळ अभिनयातच नाही, तर ती चित्रपट निर्मिती क्षेत्रात सक्रिय असून या निर्मिती संस्थेतंर्गत एक चित्रपट व वेबसीरिजची निर्मिती देखील तिने केली. शिवाय, तिचा स्वतःचा कपड्यांचा ब्रँड देखील आहे. (Tejaswini Pandit share a viral video)
विविध क्षेत्रात सक्रिय असलेली अभिनेत्री सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून ती याद्वारे विविध फोटोज व व्हिडीओज शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. तसेच, तिच्या फोटोशूट्स आणि विविध मुद्यांवर घेतलेल्या भूमिकेची सातत्याने चर्चा होते. अशातच अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला. जो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
हे देखील वाचा – “तिची गरज ओळखून…”, आईचं दुसरं लग्न का लावून दिलं? याबाबत सिद्धार्थचं पहिल्यांदाच भाष्य, म्हणाला, “भीती होती पण…”
तेजस्विनी पंडितने इंस्टाग्रामवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भाषणाचा एक व्हिडीओ शेअर केला. ज्यात ते मराठी तरुणांना स्वतःचा व्यवसाय उभं करण्याचं आवाहन केलं आहे. या व्हिडिओमध्ये ते म्हणतात, “मराठी माणसांमध्ये साधारण असं पाहायला मिळतं. आपण आपल्या घरातल्या मुलाला सांगतो, बेटा रिस्क घेऊ नको बरं, धोका घेऊ नको. तू आपली नोकरी कर, महिन्याला बँकेत पैसे ठेव. एखादा विमा काढ, आणि हफ्त्यावर घर व चारचाकी कार घे आणि सुखी संसार कर. हेच आपण आपल्या मुलाला शिकवतो. त्यांना मला इतकंच सांगायचं, हे बंद करा. आता नोकरी मागणारे नाही, तर नोकरी देणारा मराठी माणूस झाला पाहिजे.”
हे देखील वाचा – “नालायक चित्रपट बघतोच मग…”, मराठी चित्रपटांना प्रेक्षकच नाही पाहून भडकले महेश मांजरेकर, म्हणाले “आता हिंदीत डब करा कारण…”
नितीन गडकरी यांच्या त्या व्हिडीओवर तेजस्विनीने सहमती दर्शवली असून असून तिने हा व्हिडीओ तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला. ज्याला तिने “नोकरी मागणारा नाही, नोकरी देणारा मराठी माणूस असला पाहिजे!”, असं कॅप्शन देत तिने पाठिंबा दिला आहे. तिची ही पोस्टची सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून चाहते यावर विविध प्रतिक्रिया देत आहे. याआधीही तेजस्विनी विविध कारणांनी चर्चेत आली आहे. राज ठाकरेंबरोबरची भेट असो, किंवा टोल दरवाढीचा मुद्दा असो, अभिनेत्री सतत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे बरीच चर्चेत आली. लवकरच ती प्रसाद खांडेकर दिग्दर्शित ‘एकदा येऊन तर बघा’ चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.