मराठी मालिका विश्वातील प्रसिद्ध अभिनेता शशांक केतकर नेहमीच चर्चेत असतो. त्याच्या चॉकलेट बॉय लूक आणि वैशिष्ट्यपूर्ण अभिनयासाठी तो ओळखला जातो. ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतील ‘श्री’ या भूमिकेमुळे शशांक घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने अनेक मालिकांमध्ये काम केलेलं असून त्याच्या विविधांगी भूमिकांमुळे तो प्रेक्षकांचा लाडका बनला. केवळ मराठीमध्ये नाही, तर हिंदी कलाकृतींमध्ये देखील त्याने एक वेगळी ओळख निर्माण केली. त्याचबरोबर, त्याच्या सोशल मीडिया पोस्टचीही नेटकऱ्यांमध्ये बरीच चर्चा होत असते. (shashank ketkar on marine drive viral video)
अभिनयाबरोबरच शशांक सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय आहे. तो यावर त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सबाबत काही ना काहीतरी पोस्ट करत असतो. शिवाय विविध मुद्द्यांवरही आपलं स्पष्ट मत नेहमीच मांडत असतो. अश्याच एका व्हिडीओवर शशांकने आपलं मत नुकतंच व्यक्त केलं, जे सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
हे देखील वाचा – कागदाचे आकाश कंदील मिळत नसल्यानं प्रिया बापटची खंत, म्हणाली, “प्लास्टिकचे कंदील बघून…”
शशांकने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर एक व्हायरल व्हिडीओ शेअर केला, जो मुंबईतील प्रसिद्ध अश्या मरीन ड्राईव्ह मधील आहे. सर्वसामान्यांसह अनेक पर्यटक या ठिकाणाला भेट देण्यासाठी नेहमी येत असतात. त्याचबरोबर येथे अनेक जोडपीसुद्धा येत असतात. मात्र, सध्या काही प्रेमी जोडपे मरीन ड्राईव्ह येथे येऊन आक्षेपार्ह वर्तन करताना दिसतात. त्यामुळे इथे येणारी लहान मुलं व त्यांचे पालक अस्वस्थ होतात. नेमका हाच धागा पकडत त्याने हा व्हिडीओ शेअर केला. ज्याला “नेमकी पप्पी कोणाची घ्यायची हा गोंधळ होत नसेल का यांचा?”, असं कॅप्शन देत त्यावर हसण्याचा एक इमोजी पोस्ट केला. त्याच्या या स्टोरीवर अनेक नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहे.
हे देखील वाचा – कोकण हार्टेड गर्लबरोबर मलायका अरोरा मराठीत बोलली अन्…; ट्रोलर्सला उत्तर देत म्हणाल्या, “मेले जळतात आणि…”
‘होणार सून मी या घरची’, ‘पाहिले न मी तुला’, ‘हे मन बावरे’ यांसारख्या मालिकांमध्ये झळकलेला आहे. नुकताच त्याने तेलगी घोटाळ्यावर आधारित ‘स्कॅम २००३ : द तेलगी स्टोरी’ या हिंदी वेबसीरिजमधून ओटीटी विश्वात पदार्पण केले होते. ज्यात त्याने साकारलेली ‘जेके’ ही भूमिका प्रचंड गाजली. सध्या तो स्टार प्रवाहवरील ‘मुरांबा’ मालिकेत अक्षय मुकादम हे मुख्य पात्र साकारताना दिसत आहे.