शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss 17 : “माझा भाऊ शोमध्ये खूप रडला”, ‘बिग बॉस’च्या घरात येताच मुन्नवरच्या बहिणीचे वक्तव्य, म्हणाली “आमच्या कुटुंबाची…  

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 12, 2024 | 1:40 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Munnawar faruqui sister got emotional after she mate her brother video viral on social media

Bigg Boss 17 : “माझा भाऊ शोमध्ये खूप रडला”, ‘बिग बॉस’च्या घरात येताच मुन्नवरच्या बहिणीचे वक्तव्य, म्हणाली “आमच्या कुटुंबाची...

Bigg Boss 17 Updates : ‘बिग बॉस’चे यंदाचे १७ वे पर्व बऱ्याच कारणांमुळे चर्चेत आले. पहिल्या दिवसापासूनच या शोमधील अनेक ट्विस्ट्समुळे हा शो चर्चिले गेला आहे. हा शो आता अंतिम टप्प्यात आला असून घरातील स्पर्धकांमध्येआता चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. अंतिम सोहळ्याआधी या शोमध्ये ‘फॅमिली स्पेशल’ आठवड्यामध्ये घरातील स्पर्धकांच्या जवळच्या व्यक्ती हजेरी लावणार आहेत..  

‘बिग बॉस’च्या गेल्या भागांत मुन्नवर फारुकी व आयशा खान यांच्यात नॉमिनेशनवरुन भांडण इतके वाढले की, त्यांनी त्यांची वैयक्तिक आयुष्य मांडली. आयशा खानने मुनव्वरचा पर्दाफाश करताना अनेक खुलासे केले होते. त्यानंतर मुन्नवर खूप दुःखी व रडताना दिसला. कारण त्याला त्याच्या खाजगी आयुष्याबद्दलच्या गोष्टी टेलिव्हिजनवर मांडल्या जाणे, नको होते. अशातच आता मुन्नवरची बहिण अमरीन या शोमध्ये एण्ट्री करणार असून भावाला पाहून ती खूपच भावुक झाल्याची पाहायला मिळाली.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

हेही वाचा – उदयपुरहून नवविवाहित जोडपं घरी परतलं, आमिर खानला पाहताच लोकांनी घेरलं अन्…., व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

‘बिग बॉस’च्या आगामी एपिसोडचा एक प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये मुन्नवरची बहीण ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश करते. प्रवेश करताच ती घरातील सर्व सदस्यांना भेटते. त्यानंतर मुन्नवरला पाहताच ती रडू लागते आणि म्हणते की, “माझा भाऊ या शोमध्ये खूप रडला आहे.” यादरम्यान, ती मुन्नवरला मिठी मारत रडताना दिसली. त्यांना पाहून अभिषेक कुमारदेखील भावुक झाला असल्याचे दिसत आहे. पुढे अमरीन “मुन्नवर हा माझी नव्हेच, तर आमच्या कुटुंबाची शक्ती असल्याचेदेखील म्हटले आहे.

हेही वाचा – ऐतिहासिक चित्रपटात तेजस्विनी पंडित साकारणार जिजाऊंची भूमिका, पोस्टरने वेधले लक्ष, प्रेक्षकांकडूनही कौतुकाचा वर्षाव

यावेळी तिने असं म्हटलं की, “मुन्नवर हा खूप भावनिक आहे. त्याला या अवस्थेत पाहून मला खूपच त्रास होत आहे. पण मला आशा आहे की, तो लवकरच या शोमधील खेळात परत येईल आणि त्याचा खेळ सुधारेल.” दरम्यान, या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे प्रतिसाद दिला आहे. अनेकांनी कमेंट्सद्वारे मुन्नवरला धीर देण्याच्या प्रयत्न केला आहे.    

Tags: bigg bossbigg boss 17bigg boss newsBollywood Entertainment News मुन्नवर फारुकीbollywood newsentertainment newsMunnawar Faruquiबिग बॉसबिग बॉस १७बिग बॉस बातमीबॉलिवूड बातमीमनोरंजन बातमी
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Hina Khan Wedding
Entertainment

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी कामावर परतली हिना खान, अगदी सिंपल लूकमध्ये दिसली, एकटी दिसताच नेटकरी म्हणाले, “नवरदेव कुठे आहे?”

जून 6, 2025 | 10:30 am
javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Preity Zinta Networth
Entertainment

चित्रपटांपासून दूर तरीही IPL मध्ये पंजाब किंग्सच्या मालकिणीने कसं उभारलं साम्राज्य, करोडोंची उलाढाल करते आणि…

जून 5, 2025 | 6:00 pm
Sajna Movie Song
Entertainment

प्रेमाच्या नाजूक भावना टिपणारं ‘सजना’ चित्रपटातील ‘रात सजनाची’ गाण्याची हवा, हळवी बाजू मांडत जिंकली प्रेमीयुगुलांची मनं

जून 5, 2025 | 5:48 pm
Next Post
Singer Sanam Puri married with his longtime girlfriend Zuchobeni Tungoe in Nagaland see the details

प्रसिद्ध गायक सनम पुरीचा शाही विवाहसोहळा संपन्न, गर्लफ्रेंडसह थायलँडमध्ये केलं लग्नं, पाहा खास फोटो  

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.