गुरूवार, सप्टेंबर 3, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

स्वतःसाठी नव्हे तर लेकासाठी मुन्नवर फारुकीने केलं दुसरं लग्न, पहिल्यांदाच म्हणाला, “त्याला एकट्याला न सोडता…”

Majja Webdeskby Majja Webdesk
जुलै 6, 2025 | 2:00 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Munawar Faruqui second marriage

स्वतःसाठी नव्हे तर लेकासाठी मुन्नवर फारुकीने केलं दुसरं लग्न, पहिल्यांदाच म्हणाला, “त्याला एकट्याला न सोडता...”

मुनव्वर फारुकीने त्याच्या कलेच्या जोरावर कलाक्षेत्रात स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. मुनव्वर त्याच्या कामामुळे सतत चर्चेत राहिला. पण त्याचबरोबरीने त्याचं खासगी आयुष्य नेहमीच टॉक ऑफ द टाऊन ठरलं. मुनव्वरने २०२४मध्ये मेहजबीन कोटवालासह लग्न केलं. त्याने लग्नाची बातमी सांगताच अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्याचा पहिला घटस्फोट झाल्यानंतर पुन्हा लग्न करणार का? हे प्रश्नचिन्हच होतं. मात्र मुनव्वरने त्याच्या रिलेशनशिपबाबत कोणालाही कळू न देता गुपचूप दुसरं लग्न उरकलं. पण दुसरं लग्न हे फक्त मुलासाठी केलं असल्याचं मुन्नवरचं म्हणणं आहे. फराह खानबरोबर व्लॉगमध्ये संवाद साधताना त्याने याबाबत खुलासा केला. (Munawar Faruqui second marriage)

फराह मुन्नवरला लग्नाबाबत चिडवत होती. यावेळी मुनव्वर म्हणाला, “आयुष्यामध्ये जेव्हा शांती असते तेव्हा चेहऱ्यावर एक वेगळीच चमक दिसते”. ‘बिग बॉस १७’मधील मुन्नवरच्या प्रवासाबाबतही फराहने त्याच्याशी संवाद साधला. मुन्नवर प्रेम दुसऱ्याच मुलीवर करत होता आणि लग्न दुसरीबरोबरच केलं असंही फराह म्हणाली. यावरही मुन्नवरने उत्तर दिलं. मुनव्वर म्हणाला, “मी जिच्याबरोबर लग्न केलं ते आधी ठरलेलंच नव्हतं. एक महिन्यापूर्वीच बोलणं झालं आणि लगेचच आम्ही लग्न केलं”.

आणखी वाचा – “सीरिजमध्ये शिव्या असायच्या वा इंटिमेट सीन असायचे”, ओटीटी कंटेंटवर भडकले परेश रावल, म्हणाले, “लोक पाहून थकली पण…”

‘बिग बॉस १७’ शो करत असताना मुनव्वरचं लग्नाबाबत कोणतंच प्लॅनिंग नव्हतं. त्याने स्वतःच याबाबत भाष्य केलं. रिलेशनशिपबाबत खुलेपणाने सांगितलं नाही म्हणून अनेकांनी मुन्नवरला चुकीचं ठरवलं. त्याच्याबाबत गैरसमज झाले. पण शो करत असताना पत्नी कोण असणार? हेच ठाऊक नसल्याचं मुनव्वरने सांगितलं. मुनव्वरला एक मुलगा आहे. त्याचं नाव मिकेल. सतत कामात व्यग्र असल्याने मुलगा एकटाच राहत असल्याची जाणीव मुनव्वरला झाली.

आणखी वाचा – “आयुष्यभर लोकांना भुलवण्याचे उद्योग केले”, उपाध्ये-साबळे यांच्या वादावर मराठी अभिनेत्याची पोस्ट, म्हणाले, “टीकाकारांना…”

दुसऱ्यांदा लग्न करण्यावरुन फराहने मुन्नवरला विचारलं असता मुलासाठीच दुसरं लग्न केल्याचं त्याने म्हटलं. तसेच फराहने त्याला त्याच्या दुसऱ्या पत्नीबाबतही विचारलं. तेव्हा मुन्नवर म्हणाला, “तिची परिस्थितीही माझ्याशी काहीशी मिळती-जुळती होती. तिचीही १० वर्षांची एक मुलगी आहे”. माझ्या मुलालाही आईची गरज होती. म्हणून मेहजबीनला मी लगेचच लग्नासाठी विचारलं होतं. पण लग्न अगदी विचारपूर्वक केलं असल्याचं मुन्नवरचं म्हणणं आहे. कारण त्याला त्याच्या मुलाला स्वतः जवळच ठेवायचं होतं. आता मुन्नवर अगदी सुखाचा संसार करत आहे. तसेच पत्नीसाठी वेळ मिळेल तेव्हा जेवणही बनवत असल्याचं त्याने सांगितलं.

Tags: bollywood newsentertainment news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
Next Post
Mahhi vij pregnancy journey

गरोदर राहत नव्हती म्हणून मैत्रिणी, कुटुंबानेच डिवचलं, बेबी शॉवरलाही बोलवायचे नाहीत अन्...; माही विजने सांगितला वाईट काळ

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.