शुक्रवार, एप्रिल 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! ‘मुंबई लोकल’मधून सुरु होणार आहे प्रथमेश-ज्ञानदाचा रोमँटिक प्रवास, चित्रपटाचे पोस्टर समोर

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 27, 2025 | 1:30 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Mumbai Local New Movie

प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! 'मुंबई लोकल'मधून सुरु होणार आहे प्रथमेश-ज्ञानदाचा रोमँटिक प्रवास, चित्रपटाचे पोस्टर समोर

Mumbai Local New Movie : मुंबईची जान म्हणजे मुंबई लोकल. आज प्रत्येक मुंबईकर पोटाची खळगी भरायला या मुंबई लोकलवर अवलंबून असतो. आता या मुंबई लोकलचा प्रवास आता वेगळ्याच कथानकाच्या जोडीसह मोठ्या पडद्यावर येण्यास सज्ज झाला आहे. मुंबई शहराची जीवनवाहिनी असलेली मुंबई लोकल आणि त्यात फुलणारी एक प्रेमकहाणी आता ‘मुंबई लोकल’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर येत आहे. अभिनेता प्रथमेश परब आणि ज्ञानदा रामतीर्थकर ही नवीकोरी जोडी या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार असून, येत्या १ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘बिग ब्रेन प्रॉडक्शन्स’ प्रस्तुत ‘मुंबई लोकल’ या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिजित यांनी केलं आहे. ‘बिग ब्रेन प्रॉडक्शन्स’चे निलेश राठी आणि ‘आनंदी एंटरटेनमेंट’च्या प्राची अग्रवाल, सचिन अग्रवाल आणि तन्वी माहेश्वरी यांनी ‘मुंबई लोकल’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर त्र्यंबक डागा हे सहनिर्माते आहेत. चित्रपटात अभिनेता प्रथमेश परब आणि अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर ही जोडी पहिल्यांदाच एकत्र आली असून, मनमीत पेम, पृथ्वीक प्रताप, वनिता खरात, अभिजीत चव्हाण, अनिकेत केळकर, संजय खापरे, संजय कुलकर्णी, स्मिता डोंगरे अशा उत्तम कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचे छायांकन योगेश कोळी यांचे असून संकलन स्वप्निल जाधव यांनी केले आहे तर विनोद शिंदे हे असोसिएट डिरेक्टर आणि कलादिग्दर्शक डॉ.सुमित पाटील आहेत.

आणखी वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रे’तील कलाकारांचा भयंकर वेडेपणा, गाणं वाजताच बेभान होऊन नाचले अन्…; व्हिडीओ तुफान व्हायरल

चित्रपटातील गाणी गीतकार अभिजीत कुलकर्णी आणि अभिजीत यांची असून देव अँड आशिष, सुचिर कुलकर्णी व हर्षवर्धन वावरे यांनी चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन केले आहे तर पार्श्वसंगीत समीर सप्तिसकर यांचे आहे. नृत्यदिग्दर्शक म्हणून राहुल ठोंबरे यांनी काम पाहिले आहे. लोकल रेल्वेचं मुंबईमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुंबई लोकल हे अनेकांचं जणू कुटुंब आहे. लोकल प्रवासात संवाद होतात, वाद होतात, मैत्री होते, तसंच प्रेमही फुलतं. लोकल प्रवासात फुललेली अशीच एक अनोखी प्रेमकहाणी ‘मुंबई लोकल’ या चित्रपटात पाहता येणार आहे.

आणखी वाचा – “तुम्ही पाठिंबा दिल्याबद्दल…”, पूर्वाश्रमीच्या पतीच्या निधनानंतर करिष्मा कपूरची पहिली पोस्ट, हात जोडत म्हणाली…

लोकल रेल्वे काही मराठी चित्रपटांतून दाखवली गेली असली, तरी लोकलमध्ये फुलणारी प्रेमकथा पहिल्यांदाच मराठी चित्रपटात दिसणार आहे. ‘टाइमपास’, ‘टकाटक’, ‘बालक पालक’ असे अनेक यशस्वी चित्रपट केलेला प्रथमेश परब, तर ‘सख्या रे’, ‘जिंदगी नॉट आऊट’, ‘शतदा प्रेम करावे’, ‘ठिपक्यांची रांगोळी’ अशा मालिका, धुरळासारख्या चित्रपटात चमकलेली ज्ञानदा रामतीर्थकर प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहेत. ‘मुंबई लोकल’चा एक अनुभव मोठ्या पडद्यावर १ ऑगस्टपासून घ्यावाच लागणार आहे यात शंका नाही.

Tags: entertainmentMumbai Localnew movie
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

 divyanka sirohi death reason
Entertainment

सुप्रसिद्ध पंजाबी अभिनेत्रीचे वयाच्या ३०व्या वर्षी निधन, घरीच मृतावस्थेत आढळली, मृत्यूचे कारण…

एप्रिल 23, 2026 | 3:00 pm
veen doghatli hi tutena serial
Entertainment

भयंकर ऊन, घामाच्या धारा अन्…; ‘वीण दोघांतली…’च्या कलाकारांनी ४५ मिनिटांत पूर्ण केलं शूट, बहरणार रोमान्स

एप्रिल 22, 2026 | 2:50 pm
Puja Banerjee pregnant
Entertainment

टेलिव्हिजनची ‘पार्वती’ दुस-यांदा प्रेग्नंट, पळून जाऊन वयाच्या १५व्या वर्षी केलेलं लग्न, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

एप्रिल 22, 2026 | 1:00 pm
Aishwarya Rai updates
Entertainment

“आई ती शेवटी आईच”, एअरपोर्टवर लेकीला घ्यायला पोहोचले ऐश्वर्या-अभिषेक, आराध्याचे फोटोही काढले आणि….

एप्रिल 22, 2026 | 11:00 am
Next Post
Amit Bhanushali Son

एबीसीडी नाही तर थेट सारेगमप…; अर्जुनच्या लेकावरील संस्कारांचं कौतुक, पत्नीने व्हिडीओ शेअर करत दाखविली झलक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.