बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘महाराष्ट्राची हास्यजत्रे’तील कलाकारांचा भयंकर वेडेपणा, गाणं वाजताच बेभान होऊन नाचले अन्…; व्हिडीओ तुफान व्हायरल

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 27, 2025 | 11:30 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
maharashtrachi hasya jatra

'महाराष्ट्राची हास्यजत्रे'तील कलाकारांचा भयंकर वेडेपणा, गाणं वाजताच बेभान होऊन नाचले अन्…; व्हिडीओ तुफान व्हायरल

maharashtrachi hasya jatra : मालिकाविश्वातील सर्वात विनोदी आणि नेहमीच प्रेक्षकांच मन जिंकणारा कार्यक्रम पुन्हा भेटीस येत आहे. हो. हा कार्यक्रम महणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. या विनोदी कार्यक्रमाचा चाहता वर्ग फारच मोठा आहे. केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात या शोचे दिवाने आहेत. त्यामुळेच या कार्यक्रमाचे काही शो परदेशात ही केले गेले आहेत. या कार्यक्रमातील सगळ्याच कलाकारांची एकमेकांशी खूप चांगली मैत्री असलेलीही त्यांच्या सोशल मीडियावरुन कळते. ऑनस्क्रीनच नाही तर ऑफस्क्रीन सुद्धा या सर्व कलकारांमध्ये खूप चांगलं बॉंडिंग आहे. याची झलक प्रेक्षकांना प्राजक्ता माळीने शेअर केलेल्या व्हिडीओमधून पुन्हा एकदा पाहायला मिळाली आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाच्या सर्व कलाकारांनी एकत्र येत एक छोटंसं गेट टु गेदर केलं आणि यावेळी ते एन्जॉय करताना दिसले. प्राजक्ताच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर या भेटीचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षापासून प्राजक्ता या कार्यक्रमाची निवेदिका म्हणून काम पाहतेय. ज्यामध्ये प्राजक्ताच हसण, तिची निवेदनाची शैली, ‘वाह दादा वाह’ म्हणणं या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांच विशेष लक्ष वेधून घेतात. प्राजक्ताने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये हास्यजत्रेचे सगळे कलाकार एकत्र बसून गाण्यांची मैफिल एन्जॉय करत असल्याचं पाहायला मिळालं.

आणखी वाचा – अवयवदानासाठी रितेश-जेनेलियाचा मोठा निर्णय, मांसाहारी सोडलं आणि…; फिटनेससाठी घेतात विशेष मेहनत

View this post on Instagram

A post shared by Namrata Yogesh Sambherao (@namrata_rudraaj)

या गेट-टूगेदरला समीर चौघुलेंनी सुंदर जुनं गाणं गायलं. यावेळी हास्यजत्रेचे अन्य कलाकार देखील उपस्थित होते. समीर चौघुले गात असताना अभिनेता निखिल बने याने म्युझिक ड्रम वाजवून त्यांना साथ दिली.या मैफिलीत अरुण कदम, प्रभाकर मोरे, ईशा डे, सचिन गोस्वामी, समीर चौघुले, निखिल बने, प्रथमेश शिवलकर, प्रियदर्शिनी इंदलकर, शिवाली परब, चेतना भट, रसिका वेंगुर्लेकर अशा सगळ्या कलाकारांची झलक पाहायला मिळाली.

आणखी वाचा – “तुम्ही पाठिंबा दिल्याबद्दल…”, पूर्वाश्रमीच्या पतीच्या निधनानंतर करिष्मा कपूरची पहिली पोस्ट, हात जोडत म्हणाली…

यानंतर आता हास्यजत्रेतील कलाकारांचा एक तुफान डान्स व्हिडीओ साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. यांत ही कलाकार मंडळी “सुटला माझा पदर बाई मी नव्हते ध्यानात, काळूबाईचं वारं माझ्या भरलं अंगात’, या सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या गाण्यावर ठेका धरताना दिसत आहेत. त्यांचा हा डान्स व्हिडीओ पाहून अनेकांना हसूही अनावर झालं आहे. सगळ्याच कलाकारांनी बेभान होऊन या गाण्यावर डान्स करत धमाल केलेली दिसली. तर अनेक चाहत्यांनी त्यांच्या या डान्स व्हिडीओला पसंती दर्शविली आहे.

Tags: maharashtrachi hasya jatramarathi celebritymarathi show
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Salman Khan Skipped Asha Bhosle Funeral
Entertainment

Asha Bhosle Funeral : मुंबईत असूनही आशा भोसलेंच्या अंत्यसंस्काराला शाहरुख आणि सलमान खान का आले नाहीत?, कारण समोर…

एप्रिल 15, 2026 | 9:47 am
Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Next Post
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah

१७ वर्षांनी जेठालाल व बबिता जींची 'तारक मेहता…'मधून एक्झिट?, नुकत्याच झालेल्या भागात दिसले नाहीत, अय्यरचा प्रवासही संपला…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.