‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’च्या पहिल्या पर्वातून घराघरांत लोकप्रिय झालेले गायक-गायिका म्हणजे प्रथमेश लघाटे व मुग्धा वैशंपायन. आपल्या सुमधूर आवाजाने प्रथमेश-मुग्धा यांनी आपल्या रसिक श्रोत्यांची मनं जिंकली आहेत. मुग्धा व प्रथमेश हे दोघेही सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. सोशल मीडियावर ते त्यांचे फोटो व गाण्याचे व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. अशातच मुग्धा व प्रथमेशच्या परदेशात गेले असून सोशल मीडियावर त्यांनी आपले खास फोटो शेअर केले आहेत.
मुग्धा व प्रथमेश यांच्या लग्नाला आता पाच महिने पूर्ण झाले असून दोघं आता परदेशवारी करत आहेत. इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करून दोघांनी आपल्या चाहत्यांना याबद्दलची माहिती दिली आहे. आपल्या गाण्याच्या कार्यक्रमांमधून वेळ काढत हे दोघे परदेशात गेले आहेत. मुग्धाने दोन दिवसांपूर्वी मुंबई विमानतळावरील कॉफी मगचे फोटो शेअर करत खूप गरजेच्या व खूप दिवसांपासून वाट बघत असलेल्या प्रवासाला जात असल्याचे म्हटले होते. मात्र यातून हे दोघे कुठे जात होत याबद्दल सांगितले नव्हते.

अशातच प्रथमेशने नेपाळच्या निसर्गसौंदर्याचा फोटो शेअर करत ते नेपाळला गेले असल्याचे दिसत आहे. “हे नेपाळ” असं म्हणत तिने ते राहत असलेल्या हॉटेलच्या लोकेशनचाही उल्लेख केला आहे. दोघे नेपाळच्या भक्तपूरमध्ये भटकंती करत असून याचे खास फोटो प्रथमेश त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे शेअर केले आहेत. यातील काही फोटोमध्ये दोघांचा मॉडर्न लूकही पाहायला मिळत आहे. ‘नेपाळ डायरी’ असं म्हणत त्याने हे खास फोटो शेअर केले आहेत.

दरम्यान, ‘सारेगमप लिट्ल चॅम्प्स’ या लोकप्रिय कार्यक्रमातून ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीस आली. या कार्यक्रमापासूनच मुग्धा व प्रथमेश यांचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. केवळ महाराष्ट्रातचं नव्हे तर संपूर्ण देशभरात दोघांचे अनेक चाहते आहेत. या गाण्यांच्या कार्यक्रमामुळे मुग्धा व प्रथमेशचं सतत भेटणं होऊ लागलं. यादरम्यान दोघांना एकमेकांविषयी भावना निर्माण झाल्या आणि २१ डिसेंबरला त्यांनी लग्नगाठ बांधून त्यांच्या आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली.