प्रत्येक कलाकार हा कोणत्या ना कोणत्या सामन्यातून जात असतो. बरेचदा या कलाकारांना अनेक कठीण परिस्थितींना समोर जावं लागतं. काहीवेळा वैयक्तिक कारण वा काही वेळा व्यासायिक कारण देत ही कलाकार मंडळी त्यांनी लढाई सुरुचं ठेवतात. बऱ्याच कलाकारांना एखाद्या आजाराशी झुंज द्यावी लागली असल्याचंही कानावर आलं आहे. अशातच एका लोकप्रिय अभिनेत्याने त्याच्या आजारपणाबाबत केलेल्या भाष्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आहे. (Sanjay Dutt On Health)
एका असा गंभीर आजार जो ऐकला तरी नकोस वाटतं अशा आजाराचा सामना अभिनेता संजय दत्तला करावा लागला. संजय दत्त याने कॅन्सर या आजाराशी लढा दिला आहे. कॅन्सर या आजारादरम्यानचा प्रवास त्यांने अनेकदा सांगितला आहे. अशातच ‘इंडियन आयडॉल’ या रिऍलिटी शोला त्याने हजेरी लावली होती. यावेळी त्याने त्यांच्या कॅन्सर आजाराबाबत भाष्य केलं. संजय दत्त याने जेव्हा सांगितलं तेव्हा उपस्थित सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
यावेळी बोलताना संजय दत्त म्हणाला, “मला फुफुसांचा कॅन्सर आहे. स्टेज ४ चा कॅन्सर आहे. डॉक्टरांनी जेव्हा मला याबद्दल सांगितलं तेव्हा मी १ मिनिट रडलो, कारण मला मुलांची आठवण आली. पण त्यानंतर मी ठरवलं ही लढाई मी जिंकणार. जेव्हा मी पहिल्यांदा कॅन्सरची केमो थेरपी घेतली जेव्हा डॉक्टरांनी मला सांगितलं की, तुला उलटी होईल, तुझे केस जातील. पाच दिवस आराम कर. पण मी मनाशी ठरवलं. मी पहिला केमो घेतल्यानंतर जिमला गेलो. दोन तास जिम केली”.
यापुढे बोलताना तो म्हणाला, “दुसऱ्या दिवशी मी डॉक्टरकडे गेलो तेव्हा मी त्यांना म्हणालो मला शूटिंगला जायचं आहे. तेव्हा त्या म्हणाल्या तुम्ही वेडे आहात का?. त्यावेळी मी ‘समशेरा’ चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण केलं. आणि केमो थेरपीदरम्यान मी ‘केजीएफ’ चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण केलं. आणि अशाप्रकारे मी जिंकलो आहे आणि कॅन्सर हरला आहे. सांगण्याचा उद्देश हा आहे की, मी हिम्मत हरलो नाही”.