रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मिसिंग प्रकरण जरा जास्त होतंय पण…”, नवऱ्याशिवाय अंदमानला गेलेल्या मुग्धा वैशंपायनला अजिबातच करमेना, म्हणाली, “काय करु… “

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 25, 2024 | 3:55 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate

"मिसिंग प्रकरण जरा जास्त होतंय पण…", नवऱ्याशिवाय अंदमानला गेलेल्या मुग्धा वैशंपायनला अजिबातच करमेना, म्हणाली, "काय करु… "

Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate : ‘आमचं ठरलं’ म्हणत सोशल मीडियावरुन प्रेमाची कबुली देत गायिका मुग्धा वैशंपायन व गायक प्रथमेश लघाटे यांनी त्यांच्या नात्याची जाहीर कबुली दिली. त्यानंतर ही जोडी विशेष चर्चेत आली. मुग्धा व प्रथमेश यांनी अत्यंत पारंपरिक अंदाजात त्यांचा लग्नसोहळा उरकला. मुग्धा-प्रथमेशच्या लग्नाच्या फोटो, व्हिडीओनेही सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातलेला पाहायला मिळाला. मुग्धा व प्रथमेश यांचा लग्नानंतर सुखाचा संसार सुरु असलेला पाहायला मिळत आहे.

मुग्धा व प्रथमेश दोघेही लग्नानंतरचे त्यांचे दिवस एन्जॉय करताना दिसत आहेत. लग्नानंतर दोघेही प्रथमेशच्या गावच्या घरी दत्तजयंती निमित्त कार्यक्रम करताना दिसले. यावेळी दोघेही लग्नानंतर पहिल्यांदा एकत्र गायले होते. त्यानंतर दोघंही त्यांच्या कामाला लागले आहेत. मुग्धा व प्रथमेश गायनाचे अनेक कार्यक्रम करत असतात. बरेचदा ही जोडी एकत्र गायनाचे कार्यक्रम करताना दिसते तर काही वेळा दोघेही वेगवेगळया कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसतात.

आणखी वाचा – Video : ‘बिग बॉस’च्या घरात ‘त्या’ व्हिडीओमध्ये सासूला पाहताच अंकिता लोखंडेच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला, वडिलांना दोष दिला अन्…; व्हिडीओ व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Marathi Celeb's Katta (@marathicelebkatta)

सध्या मुग्धा गायनाच्या कार्यक्रमासाठी अंदमान येथे गेली आहे. दरम्यान मुग्धा अंदमान येथील अनेक व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर करत आहे. अशातच मुग्धाने शेअर केलेल्या एका स्टोरीने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मुग्धाने शेअर केलेल्या या स्टोरीमध्ये प्रथमेशला ती मिस करत असल्याचं तिने म्हटलं आहे. याचबरोबर तळटीप म्हणून “मला माहित आहे हे मिसिंग प्रकरण जरा जास्त होत आहे असं तुम्हा सगळ्यांना वाटेल पण काय करणार” असं म्हणत तिने प्रथमेशला मिस करत असल्याचं म्हटलं आहे.

आणखी वाचा – …अन् सलमान खानने शब्द पाळला, नऊ वर्षीय कॅन्सरग्रस्त मुलाची इच्छा केली पूर्ण, स्वतः त्याच्या घरी गेला आणि…

मुग्धा व प्रथमेश गेले काही दिवस कामानिमित्त वेगवेगळे आहेत. गायनाच्या कार्यक्रमांमुळे दोघांनाही वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागत आहे. अशातच दोघंही एकमेकांना मिस करत असल्याचं त्यांच्या सोशल मीडियावरुन स्टोरी पोस्ट करत सांगताना दिसत आहेत. यावरुनच हे मिसिंग प्रकरण जास्त होत आहे पण काय करणार असं म्हणत पुन्हा एकदा मुग्धाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरुन नवऱ्याला मिस करत असल्याची पोस्ट शेअर केली आहे.

Tags: entertainmentmugdha prathameshmugdha vaishampayanmugdha vaishampayan and prathamesh laghateprathamesh laghate
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Marathi actress Ashwini Mahangde has shared a post supporting Manoj Jarange Patil

“हा माणूस एक भाबडा...”, मनोज जरांगे-पाटलांच्या आंदोलनात सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री सहभागी, म्हणाली, “आता तरी न्याय...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.