सध्या सर्वत्र दिवाळीचा माहोल सुरु आहे. दिवाळीनिमित्त ठिकठिकाणी पार्टीचे आयोजन केले जात असून या विविध पार्ट्याना बॉलिवूड कलाकार हजेरी लावताना दिसत आहे. बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या घरी दिवाळीनिमित्त खास पार्टीचे नुकतंच आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. मात्र ही पार्टी विशेष कारणांनी चर्चेत राहिली, ती म्हणजे रॅपर व गायक बादशाह आणि मराठमोळी अभिनेत्री मृणाल ठाकूर यांच्या डेटिंगची. शिल्पा शेट्टीच्या या पार्टीत या दोघांनी हजेरी लावली होती. त्यावेळी दोघे एकमेकांचा हात पकडतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच दोघांच्या डेटिंगबद्दल अनेक चर्चा रंगताना दिसत आहे. (Mrunal Thakur and Badshah dating rumour)
शिल्पाच्या दिवाळी पार्टीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला असून या व्हिडिओमध्ये मृणाल व बादशाह पार्टीतून बाहेर पडताना दिसले. मृणाल यावेळी हिरव्या रंगाच्या लेहंग्यामध्ये दिसून आली. तर, बादशाह काळ्या रंगाच्या टक्सिडो सूटमध्ये दिसला. दोघंही यामध्ये खूप सुंदर दिसत होते. यावेळी पार्टी झाल्यानंतर मृणाल व बादशाह यांनी एकमेकांना मिठी मारली. त्यानंतर ते एकमेकांचा हात पडकोट त्यांच्या कारमध्ये बसले. हा व्हिडीओ समोर आल्याच्या काही तासांपूर्वी तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला, ज्यात तिच्यासह बादशाह आणि शिल्पा शेट्टी दिसत आहे.
हे देखील वाचा – ‘आई कुठे…’ फेम मधुराणी प्रभूलकरला मिळाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून शाबासकीची थाप, फोटो शेअर करत म्हणाली, “अक्षरशः…”
Mrunal Thakur and Badshah leaving after Diwali Bash????????❤️ @mrunal0801 #MrunalThakur #Badshah #ScrollandPlay pic.twitter.com/94kWEF0OXv
— Scroll & Play (@scrollandplay) November 12, 2023
दरम्यान, या पार्टीतील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी यावर विविध प्रतिक्रिया देत आहे. एक नेटकरी यावर म्हणाला, “आता हेच बघायचं राहिलं होतं.” तर दुसरा नेटकरी यावर म्हणाला, “मला यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती.’ तर काहींनी या दोघांना ट्रोल करत असून काहींनी दोघांच्या डेटिंगबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे.
हे देखील वाचा – आमिषा पटेलचं नाव घेताच करीना कपूरने फिरवलं तोंड, दोघींमध्ये वाद झाला अन्…; नेमकं प्रकरण काय?
दरम्यान, या जोडीच्या डेटिंगच्या चर्चांपूर्वी हे दोघे विविध कारणांनी चर्चेत आले होते. काही दिवसांपूर्वी मृणाल दाक्षिणात्य अभिनेत्याशी लग्न करणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, अभिनेत्रीने या चर्चा अफवा असल्याचं सांगितलं होतं. तर, बादशाहचं २०१७ मध्ये जस्मिन मसीह हिच्यासह पहिलं लग्न झालं होतं, मात्र हे लग्न काही काळ टिकलं. दोघांना एक मुलगी देखील आहे.