‘सारेगमप लिटल चॅम्प्स’ या कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री मुग्धा वैशंपायन. जगभरात मुग्धाच्या आवाजाचे लाखो चाहते दिवाने आहेत. मुग्धाने तिच्या गाण्याने साऱ्यांना भुरळ घातली आहे. सध्या सोशल मीडियावर मुग्धा बऱ्यापैकी सक्रिय असते. मुग्धाने प्रथमेश लघाटेसह लगीनगाठ बांधत चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला. तेव्हापासून मुग्धा विशेष चर्चेत आलेली पाहायला मिळाली. मुग्धा व प्रथमेश दोघेही लग्नानंतरच त्यांचं आयुष्य एन्जॉय करताना दिसत आहेत. (Mugdha Vaishampayan Sister)
लग्नानंतर दोघेही कामाला लागले आहेत. गायनाचे कार्यक्रम घ्यायला दोघांनी सुरुवात केली आहे. अशातच मुग्धाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन चाहत्यांसह आणखी एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. मुग्धा नुकतीच पदवीधर झाली आहे. मुग्धाने मुंबई विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षणात सुवर्ण पदक मिळवले आहे. मुग्धाने तिची पदवी स्वीकारतानाचा फोटो तर दुसऱ्या फोटोमध्ये तिच्या एका हातात प्रमाणपत्र व दुसऱ्या हातात सुवर्ण पदक असल्याचे फोटो शेअर करत चाहत्यांसह आनंदाची बातमी शेअर केली.

मुग्धाने ‘मास्टर्स इन क्लासिकल वोकल – गोल्ड मेडल’ या क्षेत्रात पदवीप्राप्त केली आहे. सोशल मीडियावरुन फोटो पोस्ट करत मुग्धाच्या नवऱ्याने म्हणजेच प्रथमेशनेही बायकोच्या कौतुकास्पद पोस्ट शेअर केली आहे. बायकोच भरभरुन कौतुक करत त्याने तिला शुभेच्छाही दिल्या. प्रथमेशने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे मुग्धाचा फोटो शेअर करत “हार्दिक अभिनंदन बायको” असं म्हटलं. त्याचबरोबर “मला तुझा अभिमान आहे” असंही म्हटलं आहे. मुग्धाने मुंबई विद्यापीठातून पदव्यूत्तर शिक्षणात सुवर्ण पदक मिळवले आहे आणि याचनिमित्ताने प्रथमेशने त्याच्या बायकोचे कौतुक केले.
प्रथमेश पाठोपाठ आता मुग्धाच्या लाडक्या बहिणीनेही स्टोरी पोस्ट करत भरभरुन कौतुक केलं आहे. “कित्येक रात्र तू न झोपता हे यश साध्य करण्यासाठी घेतलेले प्रयत्न व कौतुक मी पाहिलं आहे. कसलीच काळजी करु नकोस. प्रवासाच्या प्रत्येक पायरीवर तु स्वतःला सिद्ध केले आहे. मी तुझ्यावर प्रेम करते आणि मला तुझा अभिमान आहे” असं म्हणत मुग्धाच्या बहिणीने खास पोस्ट शेअर केली आहे.