गुरूवार, मे 22, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

श्रीदेवी यांच्या चित्रपटासाठी सेटवर झुरळाला पाजण्यात आली होती दारु, दिग्दर्शकानेच केला खुलासा, म्हणाले, “झुरळांना नशेत ठेवण्यासाठी…”

Saurabh Moreby Saurabh More
एप्रिल 9, 2024 | 9:48 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Mr. India movie’s director revealed that a cockroach was treated with alcohol for a scene

श्रीदेवी यांच्या चित्रपटासाठी सेटवर झुरळाला पाजण्यात आली होती दारु, दिग्दर्शकानेच केला खुलासा, म्हणाले, "झुरळांना नशेत ठेवण्यासाठी…"

नव्वदच्या दशकातील एक सुपरहिट व लोकप्रिय चित्रपट म्हणजे ‘मिस्टर इंडिया.’ आजही या चित्रपटाची लोकप्रियता कायम आहे. १९८७ साली आलेल्या या प्रेक्षकांच्या मनावर मोहर उमटवली होती. आजही हा चित्रपट अनेकांच्या आठवणीत आहे. आजही हा चित्रपट तितक्याच आवडीने पाहिला जातो. सध्या या चित्रपटाच्या सिक्वेलची जोरदार चर्चा सुरू आहे. तर या चित्रपटाशी संबंधित एक मजेशीर किस्सा आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शक शेखर कपूर यांनी चित्रपटाचा एक सीन शूट करण्यासाठी चक्क झुरळाला दारु पाजली होती. याचा खुलासा खुद्द शेखर कपूर यांनी केला आहे. ‘डेली पोस्ट’शी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं की, “चित्रपटाचा एक सीन शूट करायचा होता. ज्यामध्ये श्रीदेवी झुरळाला घाबरून खोलीतून पळत आहे आणि झुरळ तिचा पाठलाग करतो. तेव्हा मी आणि सिनेमॅटोग्राफर बाबा आझमी हे झुरळ अभिनय कसा करतील या चिंतेत होतो.”

आणखी वाचा – “तू माझ्या डोळ्यात अश्रू आणलेस कारण…”, बायकोची मेहनत पाहून गहिरवरला प्रसाद जवादे, म्हणाला, “घर शोधण्यापासून ते सोडतानाचा क्षण…”

यापुढे त्यांनी असं म्हटलं की, “आम्ही झुरळांना नशेत ठेवण्याची कल्पना सुचली. आम्ही झुरळासमोर थोडी ओल्ड मोंक रम ओतली. आम्हाला वाटले की दारु पिऊन त्याने काही गोष्टी करायला सुरुवात केली असावी. पण मी खरं सांगतो की त्याच्याकडे बघून तो खरंच दारुच्या नशेत असल्यासारखा वाटत होता. यानंतर आम्ही आमच्या सोयीनुसार तो सीन अगदी आरामात शूट केला”.

आणखी वाचा – गावात प्रशस्त घर, मोठं अंगण अन्…; शहरापासून ब्रेक घेत गावामध्ये रमली सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री, कुटुंबियांबरोबर घालवत आहे एकत्र वेळ

दरम्यान, लवकरच या चित्रपटाचा दूसरा भाग प्रेक्षकांच्या भेटला येणार असल्याचे म्हटले जात आहे. अद्याप याबबात अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण या चित्रपटाचे अनेक चाहते दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत.  मात्र श्रीदेवी, अमरीश पुरी व सतीश कौशिक या मुख्य कलाकारांचे निधन झाले आहे, त्यामुळे आता नवीन भागात कोणते कलाकार असणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

Tags: Bollywood entertainment newsbollywood movieMr. India
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Raja Shivaji Release Date Announced
Entertainment

मोठी घोषणा! रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाची तारीख समोर, सहा भाषांत होणार प्रदर्शित

मे 21, 2025 | 6:27 pm
Vaishnavi Hagwane Death
Social

पैशांसाठी मारहाण, नणंद तोंडावर थुंकली अन्…; पुण्यातील घरंदाज कुटुंबातील सूनेची आत्महत्या, आई-वडिलांनी सांगितलं नेमकं काय घडलं?

मे 21, 2025 | 5:54 pm
Sunil Shetty on Pahalgam attack
Entertainment

पहलगाम हल्ल्यावर बॉलिवूड शांत का?, सुनील शेट्टी स्पष्टच बोलले, म्हणाले, “बोललं की शिवीगाळ होते आणि…”

मे 21, 2025 | 4:09 pm
Viral Video
Entertainment

Viral Video : भर रस्त्यात नवऱ्याकडून पत्नीला मारहाण, बाळालाही फेकलं अन्…; पालक म्हणून हरले…

मे 21, 2025 | 2:50 pm
Next Post
Ranbir kapoor on paparazzi

Video : रात्री घराबाहेर आल्यानंतर रणबीर कपूरच्या गाडीसमोर लोकांची गर्दी, अभिनेता भडकला, म्हणाला, "नक्की करताय काय?"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.