बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या खूपच चर्चेत आहे. ‘रामायण’ या त्याच्या आगामी चित्रपटामध्ये तो महत्त्वाच्या चित्रपटामध्ये दिसणार आहे. २०२३ साली त्याच्या ‘ॲनिमल’ या चित्रपटाने त्याला चांगलीच प्रसिद्धी मिळवली. बॉक्स ऑफिसवर त्याच्या चित्रपटाने सगळे रेकॉर्ड मोडले. आता पुन्हा एकदा तो चर्चेत आला आहे. नवीन चित्रपटामध्ये तो ‘श्रीराम’ यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने एक नवीन अलिशान गाडी खरेदी केली आहे. त्याचे बरेच फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता पुन्हा त्याच्या गाडीमुळेच सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. (Ranbir kapoor on paparazzi)
रविवारी रणबीर रात्री उशिरा ड्राइव्हवर निघाला होता. तेव्हा त्याचे फोटो काढण्यासाठी अनेकजण त्याच्या गाडीकडे वेगाने धावत आले. त्यामुळे रणबीरची चीडचीड होताना दिसून आला. रणबीरचा फोटो क्लिक करण्यासाठी त्याचे चाहते व फोटोग्राफर्स त्याच्या कार भोवती फिरताना दिसले. पण इतक्या उशिरा इतके लोक त्याच्या भोवती येतील अशी अपेक्षा त्याला नव्हती.
जेव्हा सगळे जण त्याच्या कारभोवती जमा झाले तेव्हा त्याच्या हावभावावरुन तो वैतागलेला दिसून आला. तेव्हा तो सगळ्यांकडे बघून म्हणाला की , “हे तुम्ही काय करत आहात?”, यावेळी तो ड्रायव्हिंग सीटवर बसलेला दिसला. तसेच लोक धावत येत आहेत हे पाहून त्याने स्वतःच्या डोक्यालाही हात लावला.
मागच्या आठवड्यात त्याने आलीशान गाडी खरेदी केली. ज्याची किंमत सुमारे ६ कोटी रुपये इतकी आहे. तसेच आता त्याचा ‘रामायण’ चित्रपटातील त्याचा लूक देखील व्हायरल झाला आहे. यामध्ये त्याचे रुप अतिशय सालस दिसत आहे.
रणबीरच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर त्याने २००७ साली त्याने ‘सावरिया’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर त्याने अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत. तो त्याच्या अभिनेत्रींबरोबर असलेल्या अफेअर्समुळेही अधिक चर्चेत राहिला. त्याने २०२२ साली अभिनेत्री आलिया भट्टबरोबर लग्नगाठ बांधली. त्यांना आता राहा नावाची मुलगी असून तिचे देखील कमी वयात लाखों चाहते आहेत.