सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तू माझ्या डोळ्यात अश्रू आणलेस कारण…”, बायकोची मेहनत पाहून गहिरवरला प्रसाद जवादे, म्हणाला, “घर शोधण्यापासून ते सोडतानाचा क्षण…”

Saurabh Moreby Saurabh More
एप्रिल 8, 2024 | 3:57 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Prasad Jawade shared a special video to congratulate wife Amruta Deshmukh for winning the best actress award at Zee Natya Gaurav

"तू माझ्या डोळ्यात अश्रू आणलेस कारण...", बायकोची मेहनत पाहून गहिरवरला प्रसाद जवादे, म्हणाला, "घर शोधण्यापासून ते सोडतानाचा क्षण..."

गेले काही दिवस ज्या पुरस्कार सोहळ्याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली होती. तो मानाचा समजला जाणारा ‘झी नाट्य गौरव २०२४’ हा पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. काल (७ एप्रिल) रोजी या पुरस्कार सोहळ्याचे प्रक्षेपण झाले. यंदाच्या या ‘झी नाट्य गौरव २०२४’ या सोहळ्यामध्ये सिनेसृष्टीसह नाट्यक्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकार मंडळींनी सहभाग दर्शविला. प्रशांत दामले, मोहन जोशी, संजय मोने, वंदना गुप्ते, कविता मेढेकर, सुकन्या मोने, प्रिया बापट, उमेश कामत, सिद्धार्थ जाधव, अमृता देशमुख, वैभव मांगले, पल्लवी अजय, आशुतोष गोखले यांसारख्या अनेक कलाकारांची उपस्थिती पाहायला मिळाली.

यंदाच्या ‘झी नाट्य गौरव २०२४’ पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्री अमृता देशमुखला ‘नियम व अटी लागू’ या व्यावसायिक नाटकासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. अभिनेत्रीने काही दिवसांपूर्वी तिच्या सोशल मीडियावर हा पुरस्कार मिळाल्यानिमित्त आनंद व्यक्त केला होता. अमृताच्या नवऱ्याला म्हणजेच अभिनेता प्रसाद जवादेनेही हा खास पोस्टद्वारे अमृताला हा पुरस्कार मिळाल्याचा आनंद व्यक्त केला होता. अशातच आता प्रसादने पुन्हा एकदा त्याच्या बायकोसाठी खास व्हिडीओ शेअर करत गौरवोद्गार काढले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Prasad Jawade (@prasadjawade)

आणखी वाचा – Video : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम निखिल बनेला कुटुंबियांनी मिळून दिलं मोठं सरप्राइज, हॉटेलमध्ये आला अन्…; अभिनेताही भारावला

प्रसादने अमृतासाठी शेअर केलेल्या या पोस्टमध्ये त्याने असं म्हटलं आहे की, “अमृता आणि ‘नियम व अटी लागू’ या जोडगोळीचा प्रवास मी खुप सुरवातीपासून आणि अगदी जवळून पाहिला आहे. तालमीच्या वेळेस घर शोधण्यापासून ते प्रत्येक दौऱ्यावर जाताना घर सोडतानाचा क्षण अगदी नीट लक्षात आहे. माझी बायको उत्तम अभिनेत्री असली पाहिजे असं एका मुलाखतीत मी गंमतीने बोललो होतो आणि अमृताने ते फारच मनावर घेतलं.”

आणखी वाचा – वाशी टोलनाक्यावर फास्टटॅग स्कॅन न झाल्यामुळे घेतला टोल, कोकण हार्टेड गर्लच्या बँकमधूनही गेले पैसे, रागात म्हणाली, “भारत चंद्रावर पोहोचला तरी…”

यापुढे त्याने असं म्हटलं आहे की, “अमृताला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा जो पुरस्कार मिळाला आहे, तो तिच्या उत्तम अभिनयाबरोबरच शिस्त, चिकाटी व प्रामाणिकपणाबद्दल मिळाला आहे. अमृता मला तुझा खरच अभिमान आहे, तू माझ्या डोळ्यात अश्रू आणलेस, हा पुरस्काराचे आमच्या आयुष्यात नेहमीच एक विशेष  स्थान राहील”. दरम्यान, प्रसादने शेअर केलेल्या या खास पोस्टला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसेच तिचे कौतुक करत तिला अभिनंदनही म्हटलं आहे.      

Tags: amruta deshmukhmarathi entertainment newsprasad jawade
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
divyendu sharma on mirzapur webseries

“मुन्ना भय्या साकारताना माझी घुसमट…”, 'मिर्झापुर' फेम दिव्येंदु शर्माचं भाष्य चर्चेत, म्हणाला, “त्याचा परिणाम झाला कारण…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.