शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘मदर इंडिया’ फेम अभिनेते साजिद खान यांचे निधन, वयाच्या ७१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 28, 2023 | 9:58 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
mother india fame actor sajid khan passed away at the age of 71

'मदर इंडिया' फेम अभिनेते साजिद खान यांचे निधन, वयाच्या ७१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

हिंदी कलाविश्वतून एक मोठी बातमी समोर येत आहे. अभिनेते साजिद खान यांनी वयाच्या ७१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी ‘मदर इंडिया’ या चित्रपटामधील सुनील दत्त यांच्या बिरजूच्या लहानपणातील भूमिका साकारली होती. बिरजू या पात्राची साजिद खान यांनी प्रेक्षकांवर छाप पाडली होती. साजिद यांचा मुलगा समीर खाने पिटीआयला दिलेल्या वृत्तानुसार साजिद खान यांचे कर्करोगाने निधन झाले. गेल्या काही वर्षांपासून साजिद खान कॅन्सर आजाराने ग्रस्त होते. गेल्या शुक्रवारी म्हणजेच (२२ डिसेंबर) रोजी त्यांचं निधन झाल्याची माहिती समीरने दिली. साजिद यांनी दुसरं लग्न केलं होतं आणि त्यानंतर ते केरळमध्ये स्थायिक झाले होते. चित्रपटसृष्टीपासून ते दूर गेले होते आणि समाजहिताच्या कामात गुंतल्याचंही समीरने सांगितलं. (Mothe India Fame Actor Sajid Khan Passes Away)

“माझ्या वडिलांना राजकुमार पितांबर राणा आणि सुनीता पितांबर राणा यांनी दत्तक घेतले होते. तर मेहबूब खान यांनी त्यांचे पालनपोषण केले. ते चित्रपटामध्ये फारसे सक्रिय नव्हते आणि अधिकतर लोककल्याणासाठी काम करत होते. ते अनेकदा केरळमध्ये यायचे आणि याठिकाणी त्यांना चांगले वाटायचे. मग त्यांनी दुसरे लग्न केले आणि ते इथेच वास्तव्य करू लागले.” असेही समीरने म्हटले.

आणखी वाचा – रणबीर कपूरसह कुटुंबाला यंदाचं ख्रिसमस सेलिब्रेशन पडलं महागात, दारू ओतलेला केक कापताना ‘जय माता दी’ बोलल्यानंतर गुन्हा दाखल

ऑस्करसाठी नामांकन मिळालेल्या ‘मदर इंडिया’नंतर साजिद खानने मेहबूब खान यांच्या ‘सन ऑफ इंडिया’मध्ये मुख्य भूमिका साकारली होती. ‘माया’मध्ये काम केल्यानंतर त्यांना आंतरराष्ट्रीय ख्याती मिळाली. या चित्रपटात त्यांनी ‘रज्जी’ ही भूमिका साकारली होती. त्यानंतर तरुणाईमध्ये ते विशेष लोकप्रिय झाले होते. त्यानंतर ‘माया’ याच नावाने एक मालिकाही प्रसारित झालेली आणि यामुळे साजिद यांच्या लोकप्रियतेमध्ये आणखी वाढ झाली होती.

आणखी वाचा – ‘झिम्मा २’नंतर हेमंत ढोमेच्या नव्या चित्रपटाची घोषणा, स्वतःचं केला खुलासा, म्हणाला, “सिद्धार्थ, निर्मिती सावंत आणि…”

साजिद यांनी फिलीपिन्समध्येही आपले नाव कमावले होते. तसेच त्यांनी नोरा अनोरसह ‘द सिंगिंग फिलिपिना’, ‘माय फनी गर्ल’ आणि ‘द प्रिन्स आणि मी’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. साजिद खानने मर्चंट-आयव्हरी प्रोडक्शन ‘हीट अँड डस्ट’मध्ये एका डाकू प्रमुख भूमिकाही साकारली होती.

Tags: bollywood actorbollywood newsdeath newspasses away
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate

"अजून काय हवं?", सासरी पहिला उत्सव साजरा करण्यात रमली मुग्धा वैशंपायन, पोस्ट शेअर करत म्हणाली, "लग्नानंतर…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.