Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate : मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे ही जोडी काही दिवसांपूर्वीच विवाहबंधनात अडकली. विवाहानंतरही ही जोडी विशेष चर्चेत असलेली पाहायला मिळत आहे. लग्नानंतर मुग्धा-प्रथमेशने शेअर केलेल्या त्यांच्या लग्नातील खास क्षण, तसेच त्यांच्या साखरपुड्याच्या अनसीन फोटोंनी साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. मुग्धा-प्रथमेशचं लग्न सिनेसृष्टीत विशेष चर्चेत राहिलं. अगदी पारंपरिक अंदाजात व शाही थाटामाटात या जोडीचा विवाहसोहळा संपन्न झाला. कोकणातील चिपळूण येथे त्यांनी त्यांचं लग्नकार्य उरकलं.
लग्नानंतर मुग्धा सासरी रमलेला एक व्हिडीओ तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. मुग्धा लग्नानंतर प्रथमेशच्या घरी आरवली येथे लग्नानंतरचे दिवस एन्जॉय करताना दिसत आहे. मुग्धाने लग्नानंतरची पहिली पोस्ट शेअर करत तिच्या लग्नानंतरच्या पहिल्या उत्सवाबाबत या पोस्टद्वारे सांगितलं आहे. मुग्धाने दत्तजयंती उत्सव सासरी अगदी दणक्यात साजरा केला असल्याचं या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आलं आहे.
याबाबतची पोस्ट शेअर करत मुग्धाने म्हटलं आहे की, “आमच्या लग्नानंतरचा पहिला उत्सव! तो ही लाडक्या देवाचा. श्री दत्तजयंती. आरवलीतला घरचा दत्तजयंती उत्सव, एकत्र भजनसेवा. अजून काय हवं!?” असं कॅप्शन देत तिने दत्तजयंतीच्या उत्सवासाठी तयारी करतानाचा एक व्हिडीओदेखील शेअर केला आहे. या पोस्टवर मुग्धा व प्रथमेशच्या चाहत्यांनी त्यांचं कौतुक करत त्यांच्यावर अभिनानंदनाचा वर्षाव केला आहे. दत्तजयंती स्पेशल पूजेत मुग्धा व प्रथमेश भजन गाताना दिसत आहेत. लग्नानंतर दोघांनी एकत्र पहिलाच गायनाचा कार्यक्रम त्यांच्या गावी केलेला पाहायला मिळत आहे. मुग्धा व प्रथमेश त्यांचे लग्नानंतरचे दिवस एन्जॉय करताना दिसत आहेत.
आणखी वाचा – ‘मदर इंडिया’ फेम अभिनेते साजिद खान यांचे निधन, वयाच्या ७१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
‘आमचं ठरलं ते आमचं झालंय’ असा मुग्धा प्रथमेशचा प्रवास पार पडला असून त्यांनी त्यांच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. मुग्धाही सासरी रमलेली पाहायला मिळत आहे. शाही विवाहसोहळ्यानंतर त्यांच्या या लग्नानंतरच्या पहिल्या उत्सवानिमित्त शेअर केलेल्या व्हिडीओवर चाहते भरभरून प्रेम करताना दिसत आहेत.