MNS Leader Amey Khopkar : चित्रपटांना स्क्रीन मिळत नाही ही बोंब सर्वत्रच पाहायला मिळते. विशेषतः महाराष्ट्रात असूनही मराठी चित्रपटांना स्क्रीन मिळत नाही हा मुद्दा काही नवा नाही. गेल्या अनेक दिवसांपासून अनेक कलाकार मंडळी या विषयावर सप्ष्टपणे आपले मत मांडताना दिसतात. कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबद्दल खंत व्यक्त केलेली पाहायला मिळाली. महाराष्ट्रात सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये मराठी चित्रपट दाखवले जातात. मात्र याची संख्याही आता कमी कमी होत आहे. मराठी चित्रपटांना स्क्रीन मिळणे हे चित्रपट प्रदर्शनापूर्वीच एक नवं संकट आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही.
महाराष्ट्रात नव्हे तर जगभरात सिंगल स्क्रीन मिळण्याबाबतचा हा मुद्दा नवीन नाही. आणि ही सिंगल स्क्रीन बंद होऊ नये यासाठी आता चित्रपट निर्मात्यांनी एकत्र येत याचा लढा देणं आवश्यक आहे. हा त्रास कोणा एका चित्रपट निर्मात्याला नसून सर्वांनाच आहे. त्यामुळे यावर चर्चा करण्यासाठी आणि मार्ग काढण्यासाठी याबद्दल चिंता व्यक्त करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमेय खोपकर यांनी मराठी सिनेमाकर्त्यांना एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे.
आणखी वाचा – मध्या, आभ्या, विक्या, किरण्या शाळेत पुन्हा परतले, पण रेश्मा व केवडामध्ये गैरसमज, काय असेल नेमकं कारण?
गेल्या काही वर्षात देशातील सिंगल स्क्रीन थिएटर ची संख्या 20,000 ते 5500 (मरणासन्न) इतकी घटलीये. पुण्यातील 30 पैकी 9 बंद. गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रातील 400 पैकी 50 थिएटर कायमची बंद पडलीत, तर 50 बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. उरलेल्या थियेटर्समध्ये सिनेमा जगवायचा असेल तर मराठी…
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) January 26, 2025
अमेय खोपकर यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत असं म्हटलं की, “गेल्या काही वर्षात देशातील सिंगल स्क्रीन थिएटरची संख्या २०,००० ते ५५०० (मरणासन्न) इतकी घटलीये. पुण्यातील ३० पैकी ९ बंद. गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रातील ४०० पैकी ५० थिएटर कायमची बंद पडलील, तर ५० बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. उरलेल्या थिएटर्समध्ये सिनेमा जगवायचा असेल तर मराठी सिनेमाकर्त्यांनी एकत्र यायला हवं (आतातरी). मी लवकरच तारीख जाहीर करेन”.
मराठी चित्रपटांना स्क्रिन्स मिळत नसल्याने गेल्या काही दिवसांत कलाविश्वातून अनेक मान्यवरांनी खंत व्यक्त केली आहे. त्यामुळेच आता यावर एकत्र येऊन चर्चा करुन मार्ग काढण्याचं आवाहन अमेय खोपकर यांनी केलं आहे. ही पोस्ट त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसह मनोरंजन विश्वातील सेलिब्रिटी महेश मांजरेकर, अभिजीत पानसे, संजय जाधव, तेजस्विनी पंडित, स्वप्नील जोशी, सिद्धार्थ जाधव यांना टॅग केली आहे.