Dahavi-A series daily updates : इट्स मज्जा’च्या नवीन ‘दहावी-अ’ या वेब सीरिजला आतापर्यंत भरभरून प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत या लोकप्रिय सीरिजचे एकूण सहा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. ‘दहावी-अ’ मधून ‘दहावी-ड’ मध्ये जाण्याचा निर्णय आभ्या, किरण्या, मध्या, विक्या यांना पटला नाही. त्यामुळे त्यांनी चिडून शाळेतील वस्तूंचं नुकसान केलं. नुकसानभरपाई केल्याशिवाय शाळेत येता येणार नाही असा निर्णय शाळेकडून देण्यात आल्यामुळे आता नुकसानभरपाई करुनच शाळेत जायचं असं मुलांनी ठरवलं.
गेल्या भागात मध्या, आभ्या, विक्या व किरण्या यांनी जमेल ते काम करत पैसे जमा केले आणि नुकसान केलेल्या सर्व वस्तू शाळेत आणल्या. मात्र त्यांना शाळेतील तक्त्यांसाठी पैसे कमी पडत होते. त्यामुळे त्यांनी ते तक्ते न घेता इतर सामान न शाळेत नेले. यावेळी त्यांचे कौतुक म्हणून जंगम सरांनी त्यांचे तक्त्याचे पैसे माफ केले आणि तक्ते दिले. तसेच यावेळी त्यांनी सर्व मुलांचे कौतुकही केलं.
यानंतर छोटासा कार्यक्रम करत शिक्षकांनी या मुलांचं शाळेत पुन्हा एकदा स्वागत केलं. यावेळी मध्याने बाहेर काम करताना काय कष्ट करावे लागतात?, बाहेर कष्ट करण्यापेक्षा शाळेत अभ्यास करणे केव्हाही चांगलं याची जाणीव झाल्याचेही तो म्हणतो. तसंच पुढे आभ्यादेखील आमच्याकडून रागाच्या भरात झालेली चूक आम्हाला समजली आहे आणि पुन्हा ही चूक कधीच होणार नाही असं म्हणतो. तसेच पुढे तो जंगम सरांना आम्हाला पुन्हा एकदा ‘आठवी-अ’मध्येच बसवण्याची विनंतीही करतो.
त्यामुळे गेले १५ दिवस शाळेतून बाहेर असणारी ही मुलं अखेर शाळेत पुन्हा आले आहेत. तसंच ही मुलं पुन्हा एकदा ‘दहावी-अ’ मध्येही आले आहेत. त्यामुळे आता पुन्हा या मुलांबद्दल शाळा काय निर्णय घेणार हे? आगामी भागात पाहायला मिळणार आहे. शिवाय आगामी भागात रेश्मा व केवडा यांच्यात गैरसमजही होणार आहेत. हा गैरसमज नेमका काय असेल? हे पुढील भागात प्रेक्षकांना पाहायला मिळेल.