शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“पाकड्या गायकाला बॉलिवूडमध्ये…”, अतिफ अस्लमच्या पुनरागमनावर मनसे आक्रमक, अमेय खोपकर म्हणाले, “फाट्यावर मारण्याची…”

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 5, 2024 | 6:03 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
MNS leader Amey Khopkar has warned Bollywood singer Atif Aslam

"पाकड्या गायकाला बॉलिवूडमध्ये…", अतिफ अस्लमच्या पुनरागमनावर मनसे आक्रमक, अमेय खोपकर म्हणाले, "फाट्यावर मारण्याची…"

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाकिस्तान कलाकार, गायक यांच्याविरोधात कायमच आक्रमक भूमिका घेतली असल्याचे पाहायला मिळाले आहे. पुलवामा हल्ल्याचे पडसाद फक्त सीमेवरच नाही तर, भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांच्या सीमेच्या अंतर्गतही हा वाद चालला. या हल्ल्यानंतर भारतात पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्यात आली होती आणि यादरम्यान भारतात कोणत्याच पाकिस्तानी कलाकारांना भारतात संधी देण्यात आली नव्हती. मात्र, नुकतीच ही बंदी हटवण्यात आली आहे. 

पाकिस्तानी कलाकार अतिफ अस्लम सात वर्षांनंतर भारतीय चित्रपटात गाणं गाणार आहे. ‘लव्ह स्टोरी ऑफ ९०’ या आगामी चित्रपटातील गाणं गाण्याची ऑफर अतिफ अस्लमला देण्यात आली. परंतु, भारतात पाकिस्तानी कलाकारांना अघोषित बंदी असतानाही अतिफ अस्लम बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असल्याने राजकीय विश्वातून नाराजी व्यक्त केली जात आहे. मनसे नेते अमेय खोपकर यांनी यासंबंधीत एक पोस्ट शेअर करत त्यांचा निषेध व्यक्त केला आहे.

अतिफ अस्लम या पाकड्या गायकाला बॉलीवूड फिल्ममध्ये गाण्यासाठी इथलेच काही निर्माते पायघड्या घालतायत.
विरोध झाला तर फाट्यावर मारण्याची भाषा अरिजीत सिंग करतोय. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या बळावर फुरफुरणाऱ्यांची मस्ती आता उतरवावीच लागेल. पुन्हा पुन्हा सांगावं लागतंय हेच दुर्दैव…

— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) February 5, 2024

आणखी वाचा – दुसऱ्यांदा आई-बाबा होणार अनुष्का शर्मा व विराट कोहली, ‘या’ महिन्यात घरी येणार नवा पाहुणा, कुटुंबियांमध्ये आनंदाचं वातावरण

अमेय खोपकर यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर)वर पोस्ट शेअर करत असं म्हटलं आहे की, “अतिफ अस्लम या पाकड्या गायकाला बॉलीवूड फिल्ममध्ये गाण्यासाठी इथलेच काही निर्माते पायघड्या घालत आहेत. विरोध झाला तर फाट्यावर मारण्याची भाषा अरिजीत सिंग करत आहे. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या बळावर फुरफुरणाऱ्यांची मस्ती आता उतरवावीच लागेल. पुन्हा पुन्हा सांगावं लागत आहे, हेच दुर्दैव आहे, पण तरीही सांगतोच. पाकिस्तानी कलाकार इथे खपवून घेतले जाणार नाहीत म्हणजे नाहीत, हीच मनसेची भूमिका होती, आहे आणि यापुढेही ती राहणार आहे. फक्त बॉलीवूडच नाही, तर कोणत्याही भाषेतील चित्रपटात पाकड्यांकडून गाणं रेकॉर्ड करुन दाखवाच. हे चॅलेंज स्वीकारण्याची हिंमत कुणी करु नये, एवढाच सल्ला आत्ता देतो आहे.”

आणखी वाचा – वडील, बहिण, भाचीने दिल्या वाढदिवसाच्या भरभरुन शुभेच्छा, मात्र बायकोने फिरवली पाठ, ऐश्वर्या-अभिषेक बच्चनमध्ये पुन्हा बिनसलं?

दरम्यान, अतिफ अस्लमने सलमान खानच्या ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटात शेवटचं गाणं गायलं होतं. त्यानंतर भारत-पाकिस्तानातील वाढत्या संघर्षामुळे पाकिस्तानी कलाकारांना भारतात कला सादर करण्यावर बंदी घालण्यात आली होती. पण आता अतिफ पुन्हा त्याच्या बॉलिवूडमधील पदार्पणासाठी सज्ज झाला आहे. पण त्याला त्याचे हे आगामी गाणं गाता येणार आहे का? याबद्दल त्याच्या चाहत्यांना प्रश्न पडला आहे.   

Tags: amey khopkaratif aslamBollywood entertainment newsbollywood singerentertainment newsMNS Leaderअतिफ अस्लमअमेय खोपकरबॉलिवूड गायकमनसे नेतेमनोरंजन बातमी
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
aamir khan and kiran rao

"घटस्फोटानंतर लोक लगेच शत्रू होतात अन्…", किरण रावबरोबरच्या नात्याबाबत आमिर खान स्पष्टच बोलला, म्हणाला, "काही अडचण…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.