शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मिथुन चक्रवर्ती यांच्यावर उपचार सुरु, ब्रेनस्ट्रोक आला अन् …; तब्येतीबाबत कुटुंबियांचा खुलासा, म्हणाले, “अफवा…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 11, 2024 | 9:51 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Mithun Chakraborty Health Update

मिथुन चक्रवर्ती यांच्यावर उपचार सुरु, ब्रेनस्ट्रोक आला अन् ...; तब्येतीबाबत कुटुंबियांचा खुलासा, म्हणाले, "अफवा…"

दिग्गज अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांना १० फेब्रुवारी शनिवारी रोजी सकाळी कोलकाता येथे भरती करण्यात आले. ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्या आरोग्यासंबंधित अपडेट रुग्णालयाने अधिकृत निवेदनात सांगितले आहेत. १० फेब्रुवारी रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सकाळी त्यांच्या छातीत दुखत असल्यामुळे त्यांना कोलकाता येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिथुन चक्रवर्तीच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले की, त्यांना अस्वस्थ वाटत असल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. (Mithun Chakraborty Health Update)

आता हॉस्पिटलने मिथुन चक्रवर्ती यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत निवेदन जारी केले आहे, कारण त्यांना मेंदूचा इस्केमिक सेरेब्रोव्हस्कुलर अपघात (स्ट्रोक) झाल्याचे निदान झाले आहे. मिथुन चक्रवर्ती यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळताच त्यांच्या चाहत्यांनी काळजी व्यक्त केली आहे. मिथुन चक्रवर्ती यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी त्यांचे अनेक चाहते मंडळी प्रार्थना करत आहेत.

आणखी वाचा – “त्याच्या रक्ताने संपूर्ण रुमाल भरला अन्…”, कुशल बद्रिकेच्या पडत्या काळाबाबत विजू मानेंचा खुलासा, म्हणाले, “खांबावर आपटला तेव्हा…”

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

मिथुन यांच्या कुटुंबाने नुकतीच ‘टेली चक्कर’ला दिलेल्या मुलाखत दिली, यावेळी मदालसा शर्माने मिथुन चक्रवर्ती यांच्या छातीत दुखू लागल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याची चुकीची माहिती सांगितली असल्याचं ती म्हणाली, पुढे ती म्हणाली, “ही फक्त एक नियमित तपासणी होती, या अफवा कोण पसरवत आहे?”. मिथुन चक्रवर्तीचा मोठा मुलगा मिमोह यानेही त्याचे वडील मथून बरे असल्याचे स्पष्ट केले. ‘टाइम्स नाऊ’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “बाबा शंभर टक्के ठीक आहेत. शुगर लेव्हलच्या नियमित तपासणीसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.”

आणखी वाचा – “एक एक दागिना कपाटातून गायब व्हायचा आणि…”, रवींद्र महाजनींच्या ‘त्या’ कृत्याबाबत पत्नीचं धक्कादायक वक्तव्य, म्हणाल्या, “जुगाराच्या अड्ड्यावर…”

हॉस्पिटलच्या निवेदनात पुढे असेही म्हटले आहे की, मिथुन चक्रवर्ती हॉस्पिटलमधील अनेक डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. “श्री चक्रवर्ती यांचे न्यूरो-फिजिशियन, कार्डिओलॉजिस्ट आणि गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्टसह डॉक्टरांच्या टीमद्वारे अधिक मूल्यमापन केले जात आहे.”

Tags: entertainmentMithun Chakraborty FAMILYMithun Chakraborty HealtHMithun Chakraborty Health Update
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Titeeksha Tawde And Siddharth Bodke

'या' मराठमोळ्या अभिनेत्रीने पार पाडलं तितीक्षा-सिद्धार्थचं केळवण, स्वतःचं फोटो शेअर करत म्हणाली, "पाहुणे…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.