शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Ed Sheeranच्या मुंबईमधील कॉन्सर्टला पोहोचले मराठी कलाकार, मिताली मयेकर म्हणाली, “८ तास उभं राहिलो…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 18, 2024 | 10:40 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Mitali Mayekar On Ed Shreeran Concert

Ed Sheeranच्या मुंबईमधील कॉन्सर्टला पोहोचले मराठी कलाकार, मिताली मयेकर म्हणाली, "८ तास उभं राहिलो…"

सध्या सर्वच भारतीयांना हॉलिवूडचा प्रसिद्ध गायक Ed Sheeran ची भुरळ पडली आहे. गेल्या काही दिवसांपासून Ed Sheeran हा भारत दौऱ्यावर असून तो भारतातील चाहत्यांची मन जिंकत असल्याचं पाहायला मिळत आहे. Ed Sheeran चे भारतात लाखो दिवाने चाहते आहेत. अशातच Ed Sheeran याने नुकतीच मुंबईत हजेरी लावली. ६ मार्चला Ed Sheeran आणि पंजाबी गायक दिलजीत दोसांझ यांच्या भव्य कॉन्सर्टचं मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स मैदानात आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मुंबईकरांनी भरभरुन प्रतिसाद दिलेला पाहायला मिळाला. (Mitali Mayekar On Ed Shreeran Concert)

Ed Sheeran व दिलजीत दोसांझच्या या भव्य कॉन्सर्टला त्यांच्या हजारो चाहत्यांनी उपस्थिती लावलेली पाहायला मिळाली. यावेळी या भव्य कॉन्सर्टला मराठी कलाकक्षेत्रातील अनेक कलाकार मंडळींचा समावेश असलेला पाहायला मिळाला. अशातच अभिनेत्री मिताली मयेकर हिने या भव्य कॉन्सर्टची लाईव्ह झलक तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केली होती. यामध्ये Ed Sheeran व दिलजीत दोसांझ हे दोघेही लाइव्ह परफॉर्म करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – “हे बरोबर नाही…”, लोकसभा निवडणुकांवरुन किरण मानेंचा पंतप्रधानांना टोला, म्हणाले, “महाराष्ट्रात…”

View this post on Instagram

A post shared by Mitali Mayekar Chandekar ???? (@mitalimayekar)

मितालीबरोबर तिचा पती सिद्धार्थ चांदेकरही या भव्य कॉन्सर्टला आला होता. याशिवाय या कॉन्सर्टला रोहित राऊत, जुईली जोगळेकर या गायकांचीही उपस्थिती होती. या कॉन्सर्टमध्ये Ed Sheeran याने गायलेल्या “तेरा नी मैं लव्हर” या पंजाबी गाण्याने साऱ्यांची मन जिंकली. मितालीने या कॉन्सर्टचा व्हिडीओ तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे की, “आम्ही ८ तास उभं राहिलो ते खऱ्या अर्थाने सार्थकी लागलं कारण, या भव्य कॉन्सर्टनंतर आमचे डोळे पाणावले होते”.

आणखी वाचा – इतकं प्रशस्त आणि सुंदर आहे ऐश्वर्या नारकरांचं घर, व्हिडीओ शेअर करत संपूर्ण झलक दाखवली अन् झाल्या ट्रोल, नेटकरी म्हणाले, “पाण्याचा नळ जरा…”

मुंबईत Ed Sheeran च्या या भव्य कॉन्सर्ट दरम्यान दिलजीतसह तो परफॉर्म करणार असल्याचं कोणालाही माहिती नव्हतं. साऱ्या प्रेक्षकवर्गाला हे सरप्राईज देण्यात आलं. दिलजीतला अचानक रंगमंचावर बोलावून Ed Sheeranने सगळ्याच चाहत्यांना सुखद धक्का दिला. दोघांनीही ही कॉन्सर्ट अगदी दिमाखात पार पाडली.

Tags: entertainmentjuilee jogalekar and rohit rautMitali Mayekar On Ed Shreeran Concertsiddharth chandekar and mitali mayekar
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Next Post
Anushka Sharma And Virat Kohli

अनुष्का शर्मा व विराट कोहली लेकीसह असा घालवतात सुट्टीचा दिवस, स्वतःच खुलासा करत म्हणाला, "ती झोपली की…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.