सध्या सर्वच भारतीयांना हॉलिवूडचा प्रसिद्ध गायक Ed Sheeran ची भुरळ पडली आहे. गेल्या काही दिवसांपासून Ed Sheeran हा भारत दौऱ्यावर असून तो भारतातील चाहत्यांची मन जिंकत असल्याचं पाहायला मिळत आहे. Ed Sheeran चे भारतात लाखो दिवाने चाहते आहेत. अशातच Ed Sheeran याने नुकतीच मुंबईत हजेरी लावली. ६ मार्चला Ed Sheeran आणि पंजाबी गायक दिलजीत दोसांझ यांच्या भव्य कॉन्सर्टचं मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स मैदानात आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मुंबईकरांनी भरभरुन प्रतिसाद दिलेला पाहायला मिळाला. (Mitali Mayekar On Ed Shreeran Concert)
Ed Sheeran व दिलजीत दोसांझच्या या भव्य कॉन्सर्टला त्यांच्या हजारो चाहत्यांनी उपस्थिती लावलेली पाहायला मिळाली. यावेळी या भव्य कॉन्सर्टला मराठी कलाकक्षेत्रातील अनेक कलाकार मंडळींचा समावेश असलेला पाहायला मिळाला. अशातच अभिनेत्री मिताली मयेकर हिने या भव्य कॉन्सर्टची लाईव्ह झलक तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केली होती. यामध्ये Ed Sheeran व दिलजीत दोसांझ हे दोघेही लाइव्ह परफॉर्म करत असल्याचं पाहायला मिळत आहे.
मितालीबरोबर तिचा पती सिद्धार्थ चांदेकरही या भव्य कॉन्सर्टला आला होता. याशिवाय या कॉन्सर्टला रोहित राऊत, जुईली जोगळेकर या गायकांचीही उपस्थिती होती. या कॉन्सर्टमध्ये Ed Sheeran याने गायलेल्या “तेरा नी मैं लव्हर” या पंजाबी गाण्याने साऱ्यांची मन जिंकली. मितालीने या कॉन्सर्टचा व्हिडीओ तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे की, “आम्ही ८ तास उभं राहिलो ते खऱ्या अर्थाने सार्थकी लागलं कारण, या भव्य कॉन्सर्टनंतर आमचे डोळे पाणावले होते”.
मुंबईत Ed Sheeran च्या या भव्य कॉन्सर्ट दरम्यान दिलजीतसह तो परफॉर्म करणार असल्याचं कोणालाही माहिती नव्हतं. साऱ्या प्रेक्षकवर्गाला हे सरप्राईज देण्यात आलं. दिलजीतला अचानक रंगमंचावर बोलावून Ed Sheeranने सगळ्याच चाहत्यांना सुखद धक्का दिला. दोघांनीही ही कॉन्सर्ट अगदी दिमाखात पार पाडली.