बॉलिवूडच्या झगमगाटामागे खूप अंधार असल्याचे चित्र अनेकदा पाहायला मिळाले आहे. काही जण या मुद्द्याबद्दल व्यक्त होत नाहीत. पण आता अनेकजण याबद्दल व्यक्त होत असतात. त्यात कास्टिंग काउच हा कायमच चर्चिला जाणारा प्रश्न आहे. यावर अनेक अभिनेता व अभिनेत्री भाष्य करायला लागले आहेत. अशातच बॉलिवूडच्या एका अभिनेत्रीनेही तिला आलेल्या अनुभवांबद्दल सांगितले आहे. मिर्झापूरच्या माधुरी भाभी म्हणजेच ईशा तलवारने बॉलिवूडमध्ये चित्रपट आणि मालिकांमध्ये भूमिका कशा मिळतात याबद्दल सांगितले आहे. सोशल मीडियावरील फॉलोअर्स बघून तुम्हाला काम दिले जाते. असं तिने म्हटलं आहे.
आजच्या काळात चित्रपटांमध्ये टॅलेंटला महत्त्व नसल्याचा खुलासा इशा तलवारने एका मुलाखतीदरम्यान केला आहे. चित्रपट किंवा मालिकांसाठी सोशल मीडियावर तुमचे किती चाहते आहेत. म्हणजेच तुमचे फॉलोअर्स किती आहेत हे महत्त्वाचे असते. तुमचे फॉलोअर्स जास्त असतील तर तुम्हाला भूमिका मिळेल किंवा मेकअप आर्टिस्ट म्हणून तुमची निवड होईल. तुम्ही किती अनुभवी आहात हे महत्त्वाचे नाही.
आणखी वाचा – गुरुपौर्णिमानिमित्त प्रेक्षकांसाठी खास भेट, ‘श्री स्वामी समर्थ’ गाणं सर्वत्र प्रदर्शित
याबद्दल बोलताना तिने असं म्हटलं की, “कास्टिंगची ही पद्धत अजिबात योग्य नाही. कौशल्य किंवा प्रतिभाऐवजी फॉलोअर्सच्या जोरावर कास्टिंग करणं अजिबात योग्य नाही. कास्टिंगचा आधार केवळ टॅलेंट असला पाहिजे, लोकप्रियता नाही. पात्रांसाठी कठोर परिश्रम करतात आणि यामुळे त्यांच्या मेहनतीचा पुन्हा एकदा अनादर होतो. फॉलोअर्सच्या मते, तुम्ही ज्या व्यक्तीची निवड करत आहात ते काम त्या व्यक्तीला माहीत आहे की नाही हे तुम्ही कसे ठरवू शकता”.
यापुढे ईशा असं म्हणाली की, “तुम्ही इतकी वर्षे अभिनय शिकत आहात, डान्सचे क्लास घेत आहात, क्राफ्टिंग करत आहात, पण अचानक तुमच्या लक्षात आले की तुमची निवड कठोर परिश्रम आणि प्रतिभेवर आधारित नाही तर १५ सेकंदांच्या रिल्सच्या आधारे होणार आहे. यामुळे चुकीचा ट्रेंड सेट केला जात आहे. अभिनेत्याच्या काम करण्यासाठी तुमच्याकडे कौशल्येही हवीत. इन्स्टाग्रामवर बरेच फॉलोअर्स असून काही होत नाही”.