रविवार, सप्टेंबर 6, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

बॉलिवूडमधील कास्टिंगबाबत ‘मिर्झापूर’ फेम अभिनेत्रीचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाली, “कलाकार म्हणून काम करण्यासाठी…”

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 20, 2024 | 3:32 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Mirzapur series fame actress Isha Talwar revealed about casting in Bollywood industry know more.

बॉलिवूडमधील कास्टिंगबाबत ‘मिर्झापूर’ फेम अभिनेत्रीचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाली, “कलाकार म्हणून काम करण्यासाठी...”

बॉलिवूडच्या झगमगाटामागे खूप अंधार असल्याचे चित्र अनेकदा पाहायला मिळाले आहे. काही जण या मुद्द्याबद्दल व्यक्त होत नाहीत. पण आता अनेकजण याबद्दल व्यक्त होत असतात. त्यात कास्टिंग काउच हा कायमच चर्चिला जाणारा प्रश्न आहे. यावर अनेक अभिनेता व अभिनेत्री भाष्य करायला लागले आहेत. अशातच बॉलिवूडच्या एका अभिनेत्रीनेही तिला आलेल्या अनुभवांबद्दल सांगितले आहे. मिर्झापूरच्या माधुरी भाभी म्हणजेच ईशा तलवारने बॉलिवूडमध्ये चित्रपट आणि मालिकांमध्ये भूमिका कशा मिळतात याबद्दल सांगितले आहे. सोशल मीडियावरील फॉलोअर्स बघून तुम्हाला काम दिले जाते. असं तिने म्हटलं आहे.

आजच्या काळात चित्रपटांमध्ये टॅलेंटला महत्त्व नसल्याचा खुलासा इशा तलवारने एका मुलाखतीदरम्यान केला आहे. चित्रपट किंवा मालिकांसाठी सोशल मीडियावर तुमचे किती चाहते आहेत. म्हणजेच तुमचे फॉलोअर्स किती आहेत हे महत्त्वाचे असते. तुमचे फॉलोअर्स जास्त असतील तर तुम्हाला भूमिका मिळेल किंवा मेकअप आर्टिस्ट म्हणून तुमची निवड होईल. तुम्ही किती अनुभवी आहात हे महत्त्वाचे नाही. 

View this post on Instagram

A post shared by Isha Talwar (@talwarisha)

आणखी वाचा – गुरुपौर्णिमानिमित्त प्रेक्षकांसाठी खास भेट, ‘श्री स्वामी समर्थ’ गाणं सर्वत्र प्रदर्शित

याबद्दल बोलताना तिने असं म्हटलं की, “कास्टिंगची ही पद्धत अजिबात योग्य नाही. कौशल्य किंवा प्रतिभाऐवजी फॉलोअर्सच्या जोरावर कास्टिंग करणं अजिबात योग्य नाही. कास्टिंगचा आधार केवळ टॅलेंट असला पाहिजे, लोकप्रियता नाही. पात्रांसाठी कठोर परिश्रम करतात आणि यामुळे त्यांच्या मेहनतीचा पुन्हा एकदा अनादर होतो. फॉलोअर्सच्या मते, तुम्ही ज्या व्यक्तीची निवड करत आहात ते काम त्या व्यक्तीला माहीत आहे की नाही हे तुम्ही कसे ठरवू शकता”.

आणखी वाचा – ‘जय संतोषी माँ’ या गाजलेल्या चित्रपटाचे निर्माते दादा सतराम रोहरा यांचे निधन, वयाच्या ८५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

यापुढे ईशा असं म्हणाली की, “तुम्ही इतकी वर्षे अभिनय शिकत आहात, डान्सचे क्लास घेत आहात, क्राफ्टिंग करत आहात, पण अचानक तुमच्या लक्षात आले की तुमची निवड कठोर परिश्रम आणि प्रतिभेवर आधारित नाही तर १५ सेकंदांच्या रिल्सच्या आधारे होणार आहे. यामुळे चुकीचा ट्रेंड सेट केला जात आहे. अभिनेत्याच्या काम करण्यासाठी तुमच्याकडे कौशल्येही हवीत. इन्स्टाग्रामवर बरेच फॉलोअर्स असून काही होत नाही”.

Tags: Bollywood entertainment newsIsha TalwarMirzapur Fame Actress
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Next Post
maathi movie

‘या’ दिवशी येणार ‘नवरा माझा नवसाचा २’, सचिन पिळगांवकरांनी खास व्हिडीओ शेअर करत दिली माहिती, म्हणाले, “यावेळी..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.