शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘बिग बॉस मराठी’ फेम ‘या’ सुप्रसिद्ध अभिनेत्रीने सुरु केला स्वतःचा व्यवसाय, पोस्ट शेअर केल्यानंतर कलाकारही करत आहेत कौतुक

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 17, 2023 | 2:56 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Mira Jagannath New Business

'बिग बॉस मराठी' फेम 'या' सुप्रसिद्ध अभिनेत्रीने सुरु केला स्वतःचा व्यवसाय, पोस्ट शेअर केल्यानंतर कलाकारही करत आहेत कौतुक

अभिनय सृष्टीत काम करत करत बऱ्याच कलाकारांनी आपली पावले व्यवसायाकडे वळविली आहेत. गेल्या काही महिन्यात अनेक मराठी कलाकार निरनिराळ्या व्यवसायात उतरले आहेत. काही कलाकारांनी स्वतःचं हॉटेल सुरु केलं आहे, तर काहींनी साड्या, कपड्यांचे स्वतःचे असे ब्रॅण्ड्स सुरु केले आहेत. तर अनेकांनी दागिन्यांचा व्यवसाय सुरु केला आहे. अभिनेत्री तेजस्विनी पंडित, अभिज्ञा भावे, प्राजक्ता माळी, अक्षया नाईक, प्रार्थना बेहरे यांसारख्या अनेक अभिनेत्रींनीं अभिनयाबरोबरच व्यवसाय क्षेत्रात उडी घेतली. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत आता आणखी एका अभिनेत्रीने व्यवसाय क्षेत्रात पाऊल टाकलं आहे. (Mira Jagannath New Business)

बिग बॉस मराठी मधील एका अभिनेत्रीने स्वतःची इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी सुरू केली आहे. या कंपनीद्वारे ती अनेक कार्यक्रमाचं आयोजन व नियोजन करणार आहे. ही अभिनेत्री म्हणजे मीरा जगन्नाथ. मीराने बिग बॉसच्या घरात सहभाग घेऊन अनेक प्रेक्षकांची मनं जिंकली. बिग बॉसमुळे मीराला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. आता मीराने स्वतःची अशी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी सुरू केली आहे. मिरच्या कंपनीचं नाव आहे ‘मीरामी’ मीडिया’.

आणखी वाचा – रंगभूमी गाजवणारे अभिनेते प्रशांत दामले यांना नाट्यक्षेत्रातील नावाजलेला पुरस्कार जाहीर, चाहत्यांकडून होत आहे कौतुक

मीराने सुरु केलेल्या या कंपनीबाबत तिने इंस्टाग्राम असत करत चाहत्यांसह आनंदाची बातमी शेअर केली आहे. मीराने पोस्ट शेअर करत लिहिलं आहे की, ‘उत्कृष्ट व सुंदर गाण्यांच्या जादूचा अनुभव घ्या असं म्हणत माझ्या ‘मीरामी’ मीडिया द्वारे लवकरच उत्तम, दर्जेदार कार्यक्रम तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. आत्तापर्यंत माझ्या सर्व कलाकृतींना तुम्ही जी मोलाची साथ दिलीत तिच साथ यापुढेही देत राहाल अशी आशा. तुमच्या लाडक्या मीरा जगन्नाथच्या ‘मिरामी’ला सुद्धा असंच कायम प्रेम देत रहा.’

View this post on Instagram

A post shared by 〽️ira jagannath (@mirajagga)

आणखी वाचा – Video : हेमा मालिनीच्या वाढदिवसाला पती धर्मेंद्र यांची हजेरी, केक कापत केला भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल

मीराच्या ‘मीरामी’ या कंपनीअंतर्गत तिने गायनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. नवरात्री निमित्त गायक महेश काळे आणि हरिहरन यांच्या गायनाच्या कार्यक्रमाचं आयोजन ‘मीरामी’ या कंपनी अंतर्गत करण्यात आलं होतं. मीराच्या नव्या इनिंगची बातमी कळताच तिच्यावर अनेक चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षांव केला.

Tags: bigg bossentertainmentmarathi actressmira jagannathmira jagannath new businessmirami medianew business
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Housefull 5 Review
Entertainment

Housefull 5 Review : ‘हाऊसफुल ५’ पाहावा की नाही?, प्रेक्षकांनी चित्रपटाचा ट्विस्टच सांगितला, खरंच तुफान गर्दी आहे का?

जून 6, 2025 | 11:53 am
Niranjan Kulkarni Wedding Video
Entertainment

‘आई कुठे…’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याचं थाटामाटात लग्न, पारंपरिक पद्धतीने पार पडला विवाहसोहळा, लूकची चर्चा

जून 6, 2025 | 11:42 am
Priya bapat online shopping experience
Entertainment

प्रिया बापटला Blinkit ने पाठवला सडलेला कोबी, फोटोही केला शेअर, म्हणाली, “घाणेरड्या दर्जाच्या भाज्या…”

जून 6, 2025 | 11:07 am
muzammil ibrahim  On deepika padukone
Entertainment

तिने प्रपोज केलं, दोन वर्ष रिलेशनमध्ये होतो आणि…; दीपिका पदुकोणच्या पूर्वाश्रमीच्या बॉयफ्रेंडचा खुलासा, कोण आहे मुजम्म‍िल इब्राहिम?

जून 6, 2025 | 11:02 am
Next Post
Bollywood Actors trolled on Viral Photo

आलिया भट्ट झोपली, रणबीर कपूरचं मोबाईलवर लक्ष अन्…; नरेंद्र मोदींच्या भाषणादरम्यान ‘त्या’ कृतीमुळे बॉलिवूड कलाकार ट्रोल, फोटो व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.