‘Rejection हे माझ्यासाठी काही फार नवीन नाही’कधी अनिरुद्ध सारखं तिरसट वागता आलं असतं तर..

Milind Gawali New Post
Milind Gawali New Post

‘आई कुठे काय करते’ मालिकेतून अभिनेते मिलिंद गवळी घराघरांत पोहोचले. त्यांच्या ग्रे शेडच्या भूमिकेने ही त्यांना चांगलीच लोकप्रियता मिळवली. मिलिंद गवळी हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. मिलिंद गवळी यांचा सोशल मीडियावरील वावरही खूप मोठा आहे. ते नेहमीच काही ना काही खास पोस्ट करून चाहत्यांचा लक्ष वेधून घेत असतात. अशातच मिलिंद गवळींच्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलय. श्री माधवराव गोवलकर गुरुजींच्या भूमिकेसाठी ऑडिशन देण्याची त्यांची तडजोड या व्हडिओमधून त्यांनी मांडलीय.(Milind Gawali New Post)

या पोस्ट मध्ये मिलिंद यांनी म्हटलंय, मागील आठवड्यात कोणाचातरी फोन आला, ते म्हणाले एका चित्रपटा साठी श्री माधवराव गोवलकर गुरुजींच्या भूमिकेसाठी तुम्ही ऑडिशन द्याल का, ऑडिशन म्हटलं की मी आधीच नाही म्हणून सांगतो, पण ऑडिशन कोणासाठी ? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोविलकर गुरुजी यांच्या भूमिकेसाठी, (माधव गोळवलकर हे भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ . हिंदुत्ववादी-राष्ट्रवादी संघटनेचे द्वितीय सरसंघचालक होते. इ.स. १९४० – इ.स. १९७३ श्रीगुरुजींचे जीवन अलौकिक आणि ऋषितुल्य होते. श्रीगुरुजी सर्वार्थाने राष्ट्रऋषी होते.)

मी म्हटलं देतो ऑडिशन, ते म्हणाले getup वगैरे ची काही गरज नाही तुम्ही सेल्फ टेस्ट मोबाईलवर शूट करून पाठवा, पण मला तो गेटअप करावासा वाटला म्हणून मग मी आमचे मेकअप मन समीर म्हात्रे यांना म्हटलं सुट्टीच्या दिवशी आपण गुरुजींसारखा गेटअप करायचा प्रयत्न करूया. सकाळी नऊ ते एक वाजेपर्यंत आम्ही ती ऑडिशन शूटिंग संपवली, त्या कास्टिंगच्या गृहस्थाला तो व्हिडिओ पाठवून दिला, चार दिवसांनी त्याचा मेसेज आला की गुरुजींच्या भूमिकेसाठी तुमची निवड झाली नाही. Rejection हे माझ्यासाठी काही फार नवीन नाही आहे, आणि कलाकार म्हटलं की रिजेक्शन हा त्याच्या नशिबाला जडलेला प्रकार आहे. पण निदान चार तास का असेना अशी भूमिका जगायला मिळाली हे पण एक कलाकार म्हणून माझं भाग्यच आहे असे मी समजतो.

photo credit : milind gawali instagram

एका आयुष्यामध्ये इतके विविध आयुष्य जगायला मिळणं हे फक्त एका कलाकाराच्याच भाग्यात असतं. माझ्या भाग्यात होतं म्हणून “ आई कुठे काय करते “ मालिकेमधली अनिरुद्ध देशमुख ची भूमिका अजूनही जगतो आहे. नाहीतर आयुष्यामध्ये कधी त्याच्यासारखं तिरसट वागता आलं असतं, किती कमी कलाकारांच्या वाटेला अशी , इतक्या विविध छटांनी भरलेली भूमिका येत असेल. असे म्हणत ही पोस्ट त्यांनी शेअर केलीय.(Milind Gawali New Post)

त्यांच्या या पोस्टवर एका चाहत्याने कमेंट करत ‘अप्रतिम गेटअप झाला आहे, आणि ही भूमिका तुम्ही उत्तम वठवली असती असं मला वाटत. हुबेहूब गुरुजी! असं म्हटलंय. तर आणखी एका युजरने म्हंटलंय, इतके मोठे कलाकार असूनही आपला प्राजंळपणा कौतुकास्पद आहे. मिलिंद गवळींनी गुरुजींची ही भूमिका अगदी हुबेहूब वठवलीय हे त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओवरून कळतच आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
Onkar Bhojane Ankita Walavalkar
Read More

अंकिता आणि ओंकारच्या हळदीची रंगली चर्चा

कलाकार मंडळींनी आपला क्रश सांगितला की, प्रेक्षक त्यांच्यात नातेसंबंध असल्याच्या चर्चा करतात. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातून लोकप्रियता मिळवलेल्या ओंकार…
Hindustani Bhau Sameer Wankhede
Read More

हिंदुस्थानी भाऊचा समीर वानखेडेला पाठिंबा-जाणून घ्या काय म्हणाला हिंदुस्थानी भाऊ?

एनसीबी चे माजी संचालक समीर वानखेडे,अभिनेता शाह रुख खानचा मुलगा आर्यन खानला केलेल्या अटकेमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले
Jitendra Joshi Daughter Reva
Read More

“लेकीची १३ व्या महिन्यात पहिली ट्रिप ते १३ व्या वर्षी पहिली आंतरराष्ट्रीय ट्रिप” जितू आणि रेवाची लंडन वारी, शेअर केला खास व्हिडिओ

सगळ्या नात्यांमध्ये सगळ्यात जास्त प्रेमळ नातं समजलं जात ते म्हणजे वडील आणि मुलीचं. सध्या परदेशवारीत बिझी आहे मराठी…
Om Raut Kisses Kriti sanon
Read More

‘गुडबाय किस’ अडकली वादाच्या भोवऱ्यात, क्रिती सेनन आणि ओम राऊत झाले ट्रोल

मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर एकमेकांना निरोप देत क्रिती आणि ओम राऊत यांनी एकमेकांना मिठी मारली. दरम्यान ओम राऊत याने क्रितीला गालावर गुडबाय किस केलं