गुरूवार, एप्रिल 9, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मेमरी लॉस…” राकेश बापटच्या बहिणीने विशालला सुनावलं, नेमकं प्रकरण काय?

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 31, 2026 | 3:03 pm
in Entertainment, Trending
Reading Time: 1 min read
google-news
Raqesh Bapat sister angry on vishal kotian

राकेश बापटच्या बहिणीने विशालला सुनावलं

Raqesh Bapat sister angry on vishal kotian : ‘बिग बॉस’च्या घरात फिनाले जवळ येत असताना वातावरण दिवसेंदिवस तापत चाललं आहे. ‘बिग बॉस’ मराठीमध्ये नुकत्याच झालेल्या नॉमिनेशन टास्कने घरात मोठा वाद निर्माण केला. या टास्कमध्ये ज्या सदस्यांच्या नावाचे टीव्ही फुटतील, ते सदस्य फिनालेच्या शर्यतीतून बाहेर जाणार असल्याची घोषणा ‘बिग बॉस’ने केली. यावेळी सदस्य एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसले, आणि याच दरम्यान राकेश बापटने विशाल कोटियनला नॉमिनेट केलं. कारण देत राकेश म्हणाला, “विशाल पर्सनल लाईफबद्दल बोलतो, हे चुकीचं असल्यामुळे मी त्याला नॉमिनेट करतो”.

मात्र हा मुद्दा विशालला अजिबात पटला नाही. उलट त्यानेही राकेशवर पलटवार करत त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत भाष्य केलं. विशेषतः डिवोर्सचा मुद्दा समोर आणल्यामुळे राकेश प्रचंड संतापला. दोघांमधील वाद इतका टोकाला गेला की त्यांच्यात जोरदार भांडण झालं आणि परिस्थिती हाताबाहेर जात हाणामारीपर्यंत पोहोचली. या घटनेनंतर बाहेरही या वादाची जोरदार चर्चा सुरू झाली. याचदरम्यान राकेशच्या सोशल मीडियावर शेअर झालेल्या एका व्हिडीओमध्ये विशाल त्याला प्रश्न विचारताना दिसतो “तू जे माझ्या वयाबद्दल सतत मस्करी करत असतो, ते चुकीचं नाही का?” आणि त्या व्हिडीओमध्ये पुढे विशालने दुसऱ्या स्पर्धकाची म्हणजेच रेवा कौरासेच्या वयाची मस्करी उडवली होती. तर आता ही व्हिडीओ पाहत राकेश बापटची बहीण शीतल बापटने सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली.

आणखी वाचा – दोन वर्षांपासून सुप्रसिद्ध गायिकेचा आवाज ऐकलाच नाही, ‘या’ गंभीर आजाराने आहे त्रस्त, ऐकूच येत नाही आणि…

तिने विशालला टॅग करत एक कमेंट केली तिने म्हटलं, “1 kg बदाम पाठवते! मेमरी लॉस होतोय तुला, रोज खा जरा.” त्यामुळे आता प्रेक्षकांमध्येही चर्चा रंगली आहे, खरंच चूक कोणाची? पर्सनल विषय काढणं चुकीचं, की त्याला उत्तर देणं योग्य? आता या सगळ्या वादातून पुढे काय घडणार?, आणि प्रेक्षक कोणाच्या बाजूने उभे राहणार?, हे पाहणं खूपच उत्सुकतेचं ठरणार आहे.

आणखी वाचा – Video: हनी सिंगच्या कॉन्सर्टमध्ये गोंधळ, महिला चाहती थेट बंद गेटवर चढली आणि…; सुरक्षा रक्षकांना शिवीगाळ

Tags: entertainment newsits majjamarathi actormarathi entertainment newsRaqesh Bapat sister angry on vishal kotian
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aditi Dravid struggle
Entertainment

“मागचं वर्ष मेंटल हेल्थ फेजमध्ये होते”, अदिती द्रविडचा कठीण काळ, म्हणाली, “मी कधी बोलले नाही…”

एप्रिल 9, 2026 | 1:15 pm
Samay Raina on Controversy
Entertainment

“स्वतःच्या मुलाला पायावर उभं का नाही केलं?”, कॉमेडियनचा थेट अमिताभ बच्चनला सवाल, रोस्ट करणं पडणार महागात?

एप्रिल 9, 2026 | 10:40 am
deeksha pawar akanksha choudhary fight
Entertainment

एकमेकींचे कपडे फाडले, मारामारी केली अन्…; लोकप्रिय रिऍलिटी शोमध्ये नेमकं सुरुय काय?, नॅशनल टीव्हीवर हा प्रकार पाहून संताप

एप्रिल 9, 2026 | 9:44 am
Bigg Boss Marathi 6 Sagar Karande
Entertainment

Video : पत्नीकडून औक्षण, केक कटिंग अन्…; ‘बिग बॉस ६’ मधून घरी परतताच सागर कारंडेचं कुटुंबियांकडून कौतुक, भावुक झाला आणि…

एप्रिल 8, 2026 | 5:35 pm
Next Post
Poonam Pandey pregnancy post

पूनम पांडे आई होणार?, बेबी बंप दाखवत शेअर केला फोटो, नेटकरी म्हणाले, "मुलाचे वडील कोण?"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.