बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

शिवानी सुर्वे-अजिंक्य ननावरेच्या लग्नात मेघा धाडेचीच हवा, खास मैत्रिणीची रेशीमगाठ बांधली अन्…; म्हणाली, “आता चार हात…”

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 2, 2024 | 6:42 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Megha dhade tied the knot of shivani surve and ajinkya nanaware’s marriage

शिवानी सुर्वे-अजिंक्य ननावरेच्या लग्नात मेघा धाडेचीच हवा, खास मैत्रिणीची रेशीमगाठ बांधली अन्...; म्हणाली, “आता चार हात...”

मराठी मालिका चित्रपटांमधून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणारी अभिनेत्री शिवानी सुवे लग्नबंधनात अडकली. ३१ जानेवारी रोजी तिचा शाही लग्न सोहळा पार पडला आहे. या लग्न सोहळ्याचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून याद्वारे त्यांच्या शाही लग्न सोहळ्याची झलक पाहायला मिळाली आहे. अभिनेत्री शिवानी सुर्वे ही अभिनेता अजिंक्य ननावरे याच्यासोबत लग्नबंधनात अडकली आहे.

शिवानी-अजिंक्य यांच्या या शाही लग्नसोहळ्याला मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. ठाण्यातील ‘येऊर हिल्स’ या ठिकाणी शिवानी-अजिंक्य यांचा हा विवाहसोहळा पार पडला आहे. त्यांच्या या लग्न सोहळ्यासाठी खास शाही थाटमादेखील पाहायला मिळत आहे. शिवानी-अजिंक्यच्या या लग्नात ‘बिग बॉस’ची टीमही सहभागी झाली होती. मेघा धाडे, माधव देवचक्के, नेहा शितोळे, आरोह वेलणकर यांची खास उपस्थिती होती.

View this post on Instagram

A post shared by Megha Dhade (@meghadhade)

आणखी वाचा – शिवानी सुर्वेचं मंगळसूत्र इतर अभिनेत्रींपेक्षा आहे फारच युनिक, डिझाइनने वेधलं लक्ष, खास फोटो व्हायरल

यावेळी शिवानी-अजिंक्य यांची रेशीमगाठ अभिनेत्री मेघा धाडेने बांधली. याचे काही खास क्षण मेघाने तिच्या सोशल मीडियाद्वारे शेअर केले आहेत. “बांधते ही रेशीमगाठ, अक्षता आणि मंगलाष्टका सात, दोनाचे होणार आता चार हात, दोन जीव गुंतणार एकमेकांत” असं कॅप्शन देत मेघाने शिवानी-अजिंक्यची रेशीमगाठ बांधतानाचे फोटो शेअर केले आहेत.

आणखी वाचा – मोठा निर्णय! अभिनय क्षेत्राला रामराम करत थलपती विजयची राजकारणात एण्ट्री, स्वत:च्या पक्षाची केली स्थापना  

दरम्यान, बिग बॉस मराठी मध्ये शिवानी व मेघा यांनी सहभाग घेतला होता. या शोपासून सुरू झालेली त्यांची ही मैत्री अजूनही कायम आहे. तसेच शिवानीच्या लग्नात मेघाचा पुढाकार पाहून चाहत्यांनीही तिचे कौतुक केले आहे. तसेच शिवानी-अजिंक्य यांना त्यांच्या वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.  

Tags: Ajinkya Nanavareentertainment newsmarathi actormarathi actressmarathi entertainment newsMarathi newsmegha dhadeShivani Ajinkya marriageShivani Nanavare Ajinkya Nanavare Marriageshivani surveअजिंक्य ननावारेमनोरंजन बातमीमराठी अभिनेतामराठी अभिनेत्रीमराठी बातमीमेघा धाडेशिवानी अजिंक्य लग्नशिवानी ननावारे अजिंक्य ननावरे लग्नशिवानी सुर्वे
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Digambar Naik Controversy
Entertainment

‘दशावतार’ चित्रपटात दिगंबर नाईक पाहिजे होता?, अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाले, ” मालवणी माणूस नको…”

एप्रिल 14, 2026 | 12:21 pm
Next Post
Marathi actor Santosh Juvekar has bought a new car for his parents

लेक असावा तर असा! संतोष जुवेकरने आई-वडिलांसाठी घेतली नवीन कार, व्हिडीओ शेअर करत म्हणाला...  

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.