शुक्रवार, सप्टेंबर 4, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लेक असावा तर असा! संतोष जुवेकरने आई-वडिलांसाठी घेतली नवीन कार, व्हिडीओ शेअर करत म्हणाला…  

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 4, 2024 | 4:49 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Marathi actor Santosh Juvekar has bought a new car for his parents

लेक असावा तर असा! संतोष जुवेकरने आई-वडिलांसाठी घेतली नवीन कार, व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

‘मोरया’, ‘झेंडा’ यांसारख्या अनेक लोकप्रिय चित्रपटातून अभिनय करत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारा कलाकार म्हणजे अभिनेता संतोष जुवेकर. नानाविध भूमिका साकारत त्याने आजवर प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. अभिनयाव्यतिरिक्त तो सोशल मीडियावरदेखील तितकाच सक्रिय असतो. सोशल मीडियावर तो त्याच्या कामाबद्दलची माहिती देत असतो. त्याचबरोबर कुशल बद्रिके व अभिजीत चव्हाण यांच्याबरोबरचे धम्माल व्हिडीओही तो सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असतो आणि त्याच्या या व्हिडीओला चाहत्यांकडूनही चांगला प्रतिसाद मिळतो.

अशातच अभिनेत्याने त्याच्या सोशल मीडियावर नुकताच एक नवीन व्हिडीओ शेअर केला आहे. ज्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. संतोषने नवीन गाडी घेतल्याच्या एक व्हिडीओ त्याच्या सोशल मीडियाद्वारे शेअर केला आहे. अभिनेत्याने त्याच्या आई-वडिलांसाठी अलिशान कार खरेदी केली आहे आणि याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत आहे. संतोश ही नवीन कार खरेदी करायला गेला असताना इन्स्टाग्रामवर लाईव्ह येत त्याने हा खास व्हिडिओ काढला आहे.

View this post on Instagram

A post shared by Santosh Juvekar (@santoshjuvekar12)

आणखी वाचा – मोठा निर्णय! अभिनय क्षेत्राला रामराम करत थलपती विजयची राजकारणात एण्ट्री, स्वत:च्या पक्षाची केली स्थापना  

यावेळी व्हिडीओमध्ये तो त्याच्या आईला नवीन गाडी घेतली असल्याच्या आनंदाबद्दल विचारतो. तेव्हा त्याची आई लेकाने आमच्यासाठी गाडी घेतली असल्यामुळे आनंदी असल्याचे म्हणते. यावर संतोषही तू असशील तर अशा आणखी १०-१५ गाड्या घेऊ असं गंमतीत म्हणतो.

आणखी वाचा – शिवानी सुर्वे-अजिंक्य ननावरेच्या लग्नात मेघा धाडेचीच हवा, खास मैत्रिणीची रेशीमगाठ बांधली अन्…; म्हणाली, “आता चार हात…”

दरम्यान, संतोषने शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाईक्स वं कमेंट्सद्वारे प्रतिसाद दिला आहे. तसेच अनेकांनी कमेंट्समध्ये संतोषचे अभिनंदन केले आहे आणि आई-वडिलांना गाडी घेऊन दिल्याबद्दल अनेकांनी त्याचे कौतुकही केले आहे.            

Tags: संतोष जुवेकरमनोरंजन बातमीमराठी अभिनेतामराठी मनोरंजन बातमीमराठी बातमीentertainment newsmarathi actormarathi entertainment newsMarathi newssantosh juvekar
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
Next Post
Actor Shashank Shende opened up about his personal life in an interview with Majjacha Adda

Majjacha Adda : "दारुसाठी वरातीत नाचायचो अन्...", पहिल्यांदाच खासगी आयुष्याबाबत शशांक शेडेंचं खुलेपणाने भाष्य, म्हणाले, "मावा खाणं, नको ते चाळे करुन..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.