झी मराठी वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली परी म्हणजेच बालकलाकार मायरा वायकुळ. सोशल मीडियावरुन प्रेक्षकांपर्यंत पोहचलेल्या मायराने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावरही राज्य केलं. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालितकेमुळे ती मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा बनली. या मालिकेनंतर ती अनेक जाहिराती आणि इतर कार्यक्रमांतही झळकली. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या मायराने लहान वयात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात आपलं एक वेगळंच स्थान निर्माण केलं.
‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेनंतर मायरा ‘कलर्स टीव्ही’वरील ‘नीरजा: एक नयी पहचान’ या हिंदी मालिकेत पाहायला मिळाली. अभिनेत्री स्नेहा वाघबरोबर मायरा झळकली. मालिकांनंतर आता मोठ्या पडद्यावरही झळकणार आहे. परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ या चित्रपटात मायरा झळकणार आहे. या चित्रपटात स्वप्नील जोशी, मुक्ता बर्वे, सुप्रिया पाठारे, नम्रता संभेराव, सुकन्या मोने, शर्मिष्ठा राऊत, आशा ज्ञाते या मराठी कलाकारांनी मांदियाळी पाहायला मिळणार आहे.
अशातच आता मायराने तिच्या चाहत्यांना आणखी एक खुशखबर दिली आहे. मेरा लवकरच मोठी ताई होणार आहे. म्हणजेच मायराची आई श्वेता वायकुळ गरोदर आहे. नुकतीच मायराच्या सोशल मीडियाद्वारे याची घोषणा करण्यात आली आहे. मायराच्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पहिल्या फोटोमध्ये माझ्याकडे एक गुपित असल्याचे म्हटले आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये तिने मी मोठी ताई होणार असल्याचे म्हटले आहे.
मायराची आई हे इन्स्टाग्राम अकाऊंट चालवत असून या इनस्टाग्राम अकाऊंटवर मायराचे अनेक फोटो व्हिडिओ, रील्स पाहायला मिळतात. मायराच्या रील्सला नेटकऱ्यांची पसंती मिळताना दिसते. एखादा सण असो किंवा खास दिवस… मायराचे हटके फोटो किंवा व्हिडीओ या अकाऊंटद्वारे शेअर केले जातात. अशातच त्यांनी ही गुडन्यूजदेखील शेअर केली आहे. या फोटोंमध्ये मायराने चॉकलेटी रंगाचा फ्रॉक परिधान केला आहे, तर तिच्या आईनेही सारख्याच रंगाचा मोठा गाऊन परिधान केला आहे.
दरम्यान, मायराच्या या फोटोला अनेकांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे प्रतिसाद दिला आहे. तिने शेअर केलेल्या या फोटोखाली कलाविश्वातील अनेक कलाकारांनी कमेंट्स करत मायराचे व तिच्या आई-वडिलांचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.