बुधवार, ऑगस्ट 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

जान्हवी कपूरच्या अफेअरची जोरदार चर्चा, सुशील कुमार शिंदेंच्या नातवाला डेट करत असल्याचं पक्कं, ‘त्या’ कमेंटने वेधलं लक्ष

Majja Webdeskby Majja Webdesk
नोव्हेंबर 8, 2023 | 6:02 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Shikhar approves his relationship janhvi

Shikhar approves his relationship janhvi

अभिनेत्री जान्हवी कपूर ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तसेच तिच्या चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ती तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अफेअर्सच्या चर्चांमुळे चर्चेत आहे. गेले बरेच वर्ष जान्हवीचं नाव शिखर पहाडिया याच्याबरोबर जोडलं जात आहे. त्यांच्या अफेअर्सच्या बातम्यां सगळीकडेच जोर धरताना दिसत आहे. शिखर पहाडिया हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू आहे. जान्हवी व शिखरला अनेकदा एकत्र स्पॉट केलं गेलं आहे. काही दिवसांपूर्वी खुशी कपूरच्या वाढदिवसाच्या पार्टीतही हे दोघे एकत्र दिसले होते. त्यामुळे त्यांच्या अफेअर्सच्या चर्चांना आणखीनच उधाण आलं आहे. आताही एका पोस्टवर शिखर पहाडिया याने केलेल्या कमेंटमुळे त्यांच्या नात्यावर शिक्का मोर्तब केलं जात आहे. (Shikhar approves his relationship janhvi)

एका आठवड्यापूर्वी ओरहान अवत्रामणी याच्या इन्स्टाग्राम हँडलवर पार्टीचा व्हिडीओ समोर आला होता. यात सुहाना खान, खुशी कपूर, सारा अली खान, राशा थडानी, अलाया एफ व निर्वाण खान यांसारख्या स्टार किड्सनी हजेरी लावली होती. या पार्टीत शिखर पहाडिया व त्याचा भाऊ वीर पहाडिया देखील उपस्थित होती. मात्र जान्हवी या पार्टीत उपस्थित नव्हती.

आणखी वाचा – “म्हातारा भाईजान बुटक्याला…”, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने सलमान व आमिर खानची उडवली खिल्ली, म्हणाला, “सुपरफ्लॉप…”

या व्हिडीओमध्ये शिखर एका मुलीबरोबर पोज देताना दिसला. या व्हिडीओवर कमेंट करत जान्हवीने शिखरला टॅग करत गुलाबी ड्रेसमधील मुलगी कोण? असा प्रश्न विचारला होता. या कमेंटनंतर शिखरने तिला टॅग करत लिहिलं, “मी सर्वस्वी तुझा आहे… आणि मी फक्त तुझा आहे…” शिखरच्या या कमेंटमुळे दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याची पुष्टी होत आहे. मात्र त्यानंतर काही काळातच जान्हवी व शिखरने त्यांचे ते सर्व कमेंट डिलीट केले.  

आणखी वाचा – “कमीपणाची भावना…”, गोरं होण्यासाठी सतत फेअरनेस क्रीम वापरायचा नवाजुद्दीन सिद्दीकी, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला, “माझा चेहरा…”

जान्हवी व शिखर एकमेकांना बऱ्याच वर्षांपासून ओळखतात. मैत्रीच्या काही काळानंतर त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केलं. शिखर व जान्हवीच्या नात्याबाबतही लोकांना तेव्हा कळलं जेव्हा कॉफी विथ करणच्या एक भागात करण जौहरने याबाबत खुलासा केला होता. दरम्यानच्या काळात दोघांचं ब्रेकअप झाल्याच्याही बातम्या समोर आल्या होत्या. मात्र त्यानंतर दोघं बऱ्याचदा एकत्र दिसले होते.

Tags: bollywood actressjanhvi kapoorShikhar pahadia
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Munna Bhai Fame actor's Car Hits Two People
Entertainment

‘लगे राहो मुन्ना भाई’ फेम अभिनेत्याच्या कारची स्कूटरला धडक; दोन जण गंभीर जखमी

ऑगस्ट 18, 2026 | 2:05 pm
Govinda On Affair Rumours
Entertainment

“खरं प्रेम अस्तित्वात आहे का?”; कश्मीरा शाहच्या पोस्टने वेधलं चाहत्यांचं लक्ष, म्हणाली, “लग्न, प्रेम…”

ऑगस्ट 17, 2026 | 5:59 pm
Manjar Movie Poster Onkar Bhojane in lead role
Entertainment

तीन मित्र अन् मोठा गोंधळ; ‘मांजर’ चित्रपटाच्या पोस्टरने वाढवली उत्सुकता, १८ सप्टेंबरला उलगडणार…

ऑगस्ट 13, 2026 | 5:18 pm
Swara Bhasker breaks silence on being trolled
Entertainment

“मुस्लिमाशी लग्न करून तुम्ही लठ्ठ आणि कुरुप झालात का?”, ट्रोलिंगवर भडकली अभिनेत्री, म्हणाली, “सेक्सी मुली…”

ऑगस्ट 12, 2026 | 10:19 am
Next Post
Satvya mulichi satvi mulgi BTS

Video : सर्वत्र आग, गडबड अन्…; 'सातव्या मुलीची…'मधील 'त्या' सीनचा BTS व्हिडीओ समोर, मालिकेचे सीन रात्री जंगलात होत आहेत शूट

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.