गुरूवार, एप्रिल 23, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : फुलांची रांगोळी, डेकोरेशन, कुटुंबियांची गर्दी अन्…; मायरा वायकुळने लहान भावाचं केलं जंगी स्वागत, घरही आहे प्रशस्त

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 24, 2024 | 7:30 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Myra Vaikul Brother

मायरा वायकुळच्या भावाचे घरी स्वागत, खास सेलिब्रेशनही केलं

फार कमी वयात मायरा वायकुळ यशाच्या उच्च शिखरावर पोहोचली आहे. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतून घरा-घरात पोहोचलेली मायरा प्रसिद्ध व लोकप्रिय बालकलाकारांच्या यादीत अव्वल स्थानी आहे. मायराचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेनंतर ‘कलर्स टीव्ही’वरील ‘नीरजा: एक नयी पहचान’ या मालिकेत दिसली. छोट्या पडद्यावर स्वतःची ओळख निर्माण केल्यानंतर मायरा हिने सिनेमांमध्ये देखील काम केलं. ‘नाच गं घुमा’ या चित्रपटातून ती बालकलाकार म्हणून प्रेक्षकांच्या भेटीस आली. (Myra Vaikul Brother)

सोशल मीडियावरही मायरा बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. शिवाय तिचे आई-बाबाही सोशल मीडियावरुन नेहमीच अपडेट शेअर करत असतात. ९ एप्रिलला त्यांनी सोशल मीडियावरुन फोटो शेअर करत एक आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केली. मायरा वायकुळने मोठी ताई होणार असल्याचं यावेळी जाहीर केलं होतं. त्यानंतर अखेर वायकुळ कुटुंबात एका गोंडस बाळाचं आगमन झालं. “आमचा छोटा सुपरहिरो आला आहे. आमच्या बाळाला हॅलो म्हणा”, अशी पोस्ट करत मायराने आनंदाची बातमी दिली.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : निक्कीने अंकिताला जोरात खेचलं, तर सूरजने जान्हवीला खाली पाडत ओढलं अन्…; खेळात पुन्हा जोरदार हाणामारी

त्यानंतर मायराने शेअर केलेल्या एका व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. या व्हिडीओमध्ये मायरा तिच्या आई-वडिलांसह तिच्या चिमुकल्या भावाला हॉस्पिटलमधून घरी घेऊन येताना दिसत आहे. घरी घेऊन येताना त्यांचं संपूर्ण एकत्र कुटुंबं खूप खुश दिसत आहे. घरी आल्यावर चिमुकल्याचं औक्षण करत त्यांनी त्याच स्वागत केलं. यावेळी फुलांच्या पायघड्याही घातलेल्या पाहायला मिळाल्या. शिवाय घरात फुग्यांच्या डेकोरेशननेही साऱ्यांचं लक्ष वेधलं.

आणखी वाचा – सौरभ चौघुलेची हिंदी मालिकेत दमदार एन्ट्री, नवऱ्याची भूमिका पाहून योगिताचा आनंद गगनात मावेना, म्हणाली, “व्हिलन…”

मायराच्या भावाच्या स्वागताला त्यांचं संपूर्ण कुटुंब तिथे उपस्थित होतं. घरात औक्षण करुन स्वागत केल्यावर बाळाला त्याच्या सजवलेल्या खोलीत घेऊन गेले. त्यानंतर सहकुटुंब एकत्र येत त्यांनी एक छोटासा केक कट करत सेलिब्रेशन केलं. त्यानंतर त्यांनी चिमुकल्याला घेऊन फोटोसेशनही केलं. यावेळी वायकुळ कुटुंब खूप आनंदी असलेले दिसले. आणि त्यांनी चिमुकल्याचं अगदी दणक्यात स्वागतही केलं. इतकंच नव्हे तर मायराही तिच्या भावासाठी खूप खुश दिसली.

Tags: Myra Vaikul BrotherMyra Vaikul Brother Newsmyra vaikul family
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

veen doghatli hi tutena serial
Entertainment

भयंकर ऊन, घामाच्या धारा अन्…; ‘वीण दोघांतली…’च्या कलाकारांनी ४५ मिनिटांत पूर्ण केलं शूट, बहरणार रोमान्स

एप्रिल 22, 2026 | 2:50 pm
Puja Banerjee pregnant
Entertainment

टेलिव्हिजनची ‘पार्वती’ दुस-यांदा प्रेग्नंट, पळून जाऊन वयाच्या १५व्या वर्षी केलेलं लग्न, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

एप्रिल 22, 2026 | 1:00 pm
Aishwarya Rai updates
Entertainment

“आई ती शेवटी आईच”, एअरपोर्टवर लेकीला घ्यायला पोहोचले ऐश्वर्या-अभिषेक, आराध्याचे फोटोही काढले आणि….

एप्रिल 22, 2026 | 11:00 am
Deepali Sayed Home Coming
Entertainment

घरापासून लांब, मानसिक ताण आणि…; १०० दिवसांनी घरी परतताच दीपाली सय्यदच जंगी स्वागत, म्हणाली, “उंबरठ्यावर…”

एप्रिल 22, 2026 | 9:55 am
Next Post
25 september 2024 Wednesday daily horoscope Marathi news bhavishyavani astrology 12 zodiac sign know more

25 September Horoscope : कुंभ राशीच्या लोकांची नोकरीमध्ये आणि कर्क राशीच्या लोकांची व्यवसायामध्ये स्थिती नेमकी कशी? जाणून घ्या...   

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.