Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व विशेष गाजताना दिसत आहे. यंदाच्या या पर्वात सगळेच स्पर्धक धुमाकूळ घालताना दिसत आहेत. मात्र आता हे पर्व अंतिम टप्प्यात आलं असल्याचं पाहायला मिळत आहे. यंदाचा सीझन केवळ ७० दिवसांत संपणार आहे. यापूर्वीचे प्रत्येक सीझन हे १०० दिवसांचे होते. मात्र यंदाच्या पर्वाने लवकरच आटोपता घेतला आहे. याची अधिकृत घोषणा नुकतीच ‘बिग बॉस’कडून करण्यात आली. त्यामुळे साऱ्यांच्या नजरा आता ट्रॉफीकडे वळल्या आहेत. ‘बिग बॉस मराठी’चे शेवटचे १३ दिवस शिल्लक राहिले आहेत.
गेल्या दोन महिन्यांपासून या शोमधील प्रत्येक सदस्याची चर्चा होत आहे. एकूण दहा आठवडे हे पर्व सुरु राहील अशी घोषणा ‘बिग बॉस’कडून करण्यात आली आहे. त्यानंतर ६ ऑक्टोबर हा शोचा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे.आता शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये या खेळात कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान ‘बिग बॉस’ ने या आठवड्यात आठच्या आठ स्पर्धकांना नॉमिनेट केलं आहे. त्यामुळे ट्रॉफीसाठी स्पर्धकांमध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे.
सध्या घरात नवव्या आठवड्याचा खेळ सुरु आहे. यानिमित्त ‘बिग बॉस’कडून सदस्यांना एक हटके टास्क देण्यात आला आहे. हा टास्क खेळतानाचा एक प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये स्पर्धक मंडळी धमाल करत धुमाकुळ घालताना दिसत आहेत. आता ‘बिग बॉस’च्या घरात लगोरीचा टास्क रंगणार आहे. नुकताच या खेळाचा नवा प्रोमो समोर आला आहे. यामध्ये सगळेच सदस्य आता साम, दाम, दंड, भेद व युक्ती वापरुन खेळत आहेत.
समोर आलेल्या प्रोमोमध्ये लगोरीचा खेळ रंगताना पाहायला मिळत आहे. यामध्ये टास्कदरम्यान निक्की अंकिताला खेचत म्हणते, “माझ्याशी पंगा महागात पडेल”. तर धनंजय खेळताना असं म्हणताना दिसत आहे की, “तोंड शिवा आणि वर बसा”. तर या खेळत सूरज मात्र प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणार असल्याचं समोर येत आहे. सूरज व जान्हवीच्या झटापटीत जान्हवीला लागल्याने ती जोरात किंचाळताना दिसत आहे. आता सदस्यांना घरात स्वतःच अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक टास्क जिद्दीने खेळावा लागणार आहे. दरम्यान उरलेल्या या शेवटच्या दिवसात कोणता सदस्य बाजी मारेल हे पाहणं रंजक ठरणार आहे.