रंगभूमी व रुपेरी पडद्यावरील आपल्या विविधांगी भूमिकांमुळे कलाकारांची प्रेक्षकांमध्ये एक वेगळीच ओळख निर्माण होते. अशीच एक अभिनेत्री आहे, जिला या भूमिकेसाठी विशेष ओळख मिळाली आहे. त्याचबरोबर या भूमिकांमधून आपल्या अभिनयाची वेगळीच छाप पाडलेली आहे. ती म्हणजे अभिनेत्री विशाखा सुभेदार. विशाखा सुभेदार गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने प्रेक्षकांचं मनोरंजन करत आलेल्या आहे. विनोदी असो किंवा खलनायकी भूमिका, त्यांनी साकारलेल्या प्रत्येक भूमिकेचे रसिकांकडून भरभरून प्रेम मिळालेलं आहे. (Vishakha Subhedar on netizen’s Comment)
विशाखा सध्या खलनायिकेच्या रूपात रसिकांना दिसत असली, तरी याआधी ‘फु बाई फु’, ‘कॉमेडी एक्सप्रेस’ या विनोदी कार्यक्रमांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. पुढे ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमात काही वर्ष काम केलेलं असून याच कार्यक्रमातून त्या लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचल्या होत्या. मात्र, ऐन लोकप्रियतेच्या शिखरावर असताना त्यांनी या कार्यक्रमाचा निरोप घेतला होता. त्यानंतर यावरून त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. पण तरीही चाहते त्यांना कार्यक्रमात परतण्यासाठी विनंती करत आहे. अशातच विशाखाने एका चाहत्याच्या कमेंटला उत्तर देत हा कार्यक्रम सोडण्यामागील कारण सांगितले आहे.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाचे राज्यासह देश-विदेशात तमाम चाहते असून याच कार्यक्रमामुळे विशाखाची एक वेगळी फॅन फॉलोविंग बनली आहे. दरम्यान, अभिनेत्रीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यावर अनेक चाहते कमेंट करताना दिसत आहेत. मात्र यातील एका चाहत्याने अशी कमेंट केली, ज्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
हे देखील वाचा – Video : आईच्या आठवणीमध्ये अभिनेता अजिंक्य देव भावुक, म्हणाला, “भरभरुन प्रेम देणारी माय…”
विशाखाने नुकतंच एक व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये ती डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओला नेटकरी व चाहत्यांनी पसंती दर्शवली असून याच व्हिडिओवर एका नेटकऱ्याने कमेंट केली आहे. या कमेंटमध्ये नेटकरी म्हणाला की, “विशू ताई, आता तरी हास्यजत्रा मध्ये लवकर या, आम्ही तुम्हाला खूप मिस करतोय. तुमचे काय प्रॉब्लेम असतील, ते आम्हाला कळतं. पण ते सर्व बाजूला ठेवून तुमच्या चाहत्यांसाठी या.” त्यावर उत्तर देताना विशाखा म्हणते, “कार्यक्रमाचा काहीच प्रॉब्लेम नाही. सातत्याने तेच करतेय म्हणून मी बाजूला झालेय”.
हे देखील वाचा – चाहत्याने छत्रपती संभाजी महाराजांबरोबर गश्मीर महाजनीची केली तुलना, अभिनेता म्हणतो, “माझ्यामध्ये त्यांच्या…”
अभिनेत्री विशाखा सुभेदार सध्या स्टार प्रवाहावरील ‘शुभविवाह’ या मालिकेत रागिणीची भूमिका साकारताना दिसत आहे. शिवाय, त्यांचे रंगभूमीवर ‘कुर्रर्रर्र’ नाटकदेखील मोठ्या प्रतिसादाने सुरु आहे.