मराठी मनोरंजन सृष्टीत अनेक कलाकार आहेत जे ट्रोलिंगचा सामना करत असतात. या नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगचा कचाट्यात एक अभिनेता पुरता अडकला आहे, तो म्हणजे अभिनेता गश्मीर महाजनी. गश्मीर महाजनी याचे वडील म्हणजेच ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर गश्मीरवर रवींद्र महाजनी यांच्या चाहत्यांनी अनेक प्रश्नोत्तरे करत त्याला ट्रोल केलं. अभिनेते रवींद्र महाजनी हे घरापासून दूर एकटेच राहत होते, शिवाय त्यांच्या मृत्यूची बातमी ही दोन दिवसानंतर कळाली, त्यामुळे वडिलांच्या निधनाला अनेकांनी गश्मीरला जबाबदार ठरवले. तेव्हापासून गश्मीर विशेष चर्चेत आहे. (Gashmeer Mahajani Reaction)
गश्मीरने ही चाहत्यांच्या प्रश्नांना सडेतोड उत्तर देत पलटवार केला. सोशल मीडियावर गश्मीर बऱ्यापैकी सक्रिय असतो. तो नेहमीच त्यांच्या चाहत्यांसोबत संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो. अशातच काही दिवसांपूर्वी गश्मीरने ‘Ask Gash’ हा सेगमेंट चाहत्यांसोबत ठेवला होता. याआधी ही गश्मीरने असा सेगमेंट ठेवला होता. त्यावेळी ही गश्मीरने चाहत्यांना मनमोकळेपणाने त्यांच्या प्रश्नांनाही उत्तरे दिली. बरेचदा चाहते गश्मीरला वैयक्तिक आयुष्याबद्दल, त्याच्या चित्रपटांबद्दल प्रश्न विचारतात,या चाहत्यांच्या प्रश्नांना गश्मीर योग्य ते उत्तर देत त्यांच्याशी संपर्कात राहत असतो. अशातच या नव्या सेगमेंटमध्ये चाहत्याने त्याची तुलना छत्रपती संभाजी महाराजांसह केली. चाहत्यांच्या या प्रश्नावरही गश्मीरने उत्तर दिलं आहे.

गश्मीरने इन्स्टाग्रामवर ‘Ask Gash’ सेशन ठेवलं. यावेळी एका चाहत्याने “सर तुमच्याही जीवनातला संघर्ष काहीसा छत्रपती संभाजी महाराजांसारखा आहे,” असं म्हटलं. चाहत्याच्या या प्रश्नाला गश्मीरने उत्तर देत म्हटलं की, “तुम्ही खूप मोठी तुलना करत आहात, माझ्यात त्यांच्या नखाचीही सर नाही,” असं गश्मीर चाहत्याला म्हणाला.
वडिलांच्या निधनानंतर गश्मीरने कामातून ब्रेक घेतला होता, मात्र आता त्याने पुन्हा एकदा कामाला सुरुवात केली आहे. त्याने एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना त्याच्या नव्या कामाची माहिती दिली. “पुन्हा एकदा तोच प्रवास… लवकरच …” असं कॅप्शन देत गश्मीरने एक व्हिडीओ शेअर केला होता. यावरून तो लवकरच पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार असल्याचं समजतंय.