शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : ३३ वर्ष नोकरी, सेवानिवृत्ती अन्…; मुग्धा वैशंपायनच्या आई-वडिलांना अश्रू अनावर, नावाजलेल्या कंपनीमध्ये सन्मान आणि…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 4, 2023 | 12:15 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Mugdha Vaishampayan Father Retirement

Video : ३३ वर्ष नोकरी, सेवानिवृत्ती अन्…; मुग्धा वैशंपायनच्या आई-वडिलांना अश्रू अनावर, नावाजलेल्या कंपनीमध्ये सन्मान आणि…

मराठी गायिका मुग्धा वैशंपायन ही तिच्या सुमधुर गाण्यांमुळे घराघरांत पोहोचली आहे. ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमातून मुग्धाने प्रेक्षकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केलं. लवकरच प्रेक्षकांची लाडकी मुग्धा गायक प्रथमेश लघाटेबरोबर बोहोल्यावर चढणार आहे. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी ‘आमचं ठरलं’ असं म्हणत त्यांच्या नात्याची कबुली दिली होती. त्यांनतर आता ही जोडी कधी लग्नबंधनात अडकणार याकडे चाहते डोळे लावून बसले आहेत. (Mugdha Vaishampayan Father Retirement)

प्रथमेश व मुग्धा नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतात. काही ना काही शेअर करून ते चाहत्यांच्या संपर्कात असतात. याशिवाय अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमांचे व्हिडिओही ते चाहत्यांसह शेअर करत असतात. अशातच मुग्धाने सोशल मीडियावरून शेअर केलेल्या एका व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मुग्धाने तिच्या वडिलांच्या निवृत्ती समारंभ सोहळ्याचा खास व्हिडीओ शेअर केला आहे.

आणखी वाचा – “पहिल्यांदा ते भेटले आणि…”, अशोक सराफांच्या भेटीनंतर समीर परांजपेची भावुक पोस्ट, म्हणाला, “ते मला ओळखतात याचं…”

वडिलांच्या निवृत्ती समारंभाचा व्हिडीओ शेअर करत तिने खास कॅप्शन देत, “३० नोव्हेंबर २०२३. बाबा गेली सुमारे ३३ वर्ष नागोठणे येथील IPCL / रिलायंस इंडस्ट्रीस मध्ये कार्यरत होते. सलग ३३ वर्ष एकाच ठिकाणी, एकाच प्लांट मध्ये कार्यरत असल्यामुळे त्यांचं आणि आमचं सुद्धा कंपनी बरोबर भावनिक नातं होतं, आजही आहे. ३० नोव्हेंबरला बाबा रिटायर झाले. त्या दिवसाचे काही भावनिक क्षण शेअर करत आहे” असं म्हटलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Mugdha Bhagawan Vaishampayan (@mugdhabhagawan5)

आणखी वाचा – “पाखरं भरारी मारायला…”, ‘कुर्रर्रर्र’ नाटकामधून प्रसाद-नम्रताच्या एक्झिटनंतर विशाखा सुभेदारची पोस्ट चर्चेत, म्हणाली, “माझ्या हाकेला…”

मुग्धाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिच्या वडिलांच्या कंपनीत त्यांनी सहकुटुंब उपस्थिती लावलेली पाहायला मिळत आहे. या व्हिडिओमध्ये मुग्धाच्या वडिलांचा सत्कार सोहळा पाहायला मिळाला. यावेळी बोलताना मुग्धाचे वडील भावुकही झालेले दिसले. तसेच तिच्या वडिलांच्या सहकाऱ्यांनीही त्यांचं तोंडभरून कौतुक केलं. सत्कार समारंभातून घरी परतल्यानंतर मुग्धा व तिच्या कुटुंबीयांनी घरी आल्यावर सरप्राईज देत त्यांचं स्वागतही केलं. मुग्धाच्या या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट तिच्या वडिलांना रिटायरमेंटच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Tags: entertainmentmarathi singermugdha vaishampayanmugdha vaishampayan fatherMugdha Vaishampayan Father Retirement
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Mugdha Vaishampayan Sister Wedding

हळद लागली! मुग्धा वैशंपायनच्या बहिणीची लगीनघाई, हळदीचे फोटो समोर, पोस्ट शेअर करत म्हणाली, "ताईची…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.