शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“आपल्या सणांच्या पोस्ट टाकल्यास का?”, ख्रिसमसच्या फोटोंवरुन मराठी अभिनेत्याला नेटकऱ्याने सुनावलं, भडकून म्हणाला, “ईदलाही माहीमला जातो आणि…”

Shamal Sawantby Shamal Sawant
डिसेंबर 26, 2024 | 11:07 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
onkar raut viral post

ओंकार राऊत नेटकऱ्यावर भडकला

टेलिव्हीजनवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमामुळे अनेक कलाकार प्रकाशझोतात आले. त्यातील एक कलाकार म्हणजे ओंकार राऊत. ओंकारने आजवर त्याच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. ओंकार राऊतला महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमामुळे अफाट लोकप्रियता मिळाली. अभिनयाची उत्तम जाण व विनोदाचं अचूक टायमिंग साधत ओंकार प्रेक्षकांचं मनोरंजन करतो. अभिनयाबरोबरच ओंकार सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रीय असतो. अनेकदा त्याच्या पोस्ट मोठ्या प्रमाणात चर्चेत येताना दिसतात. मात्र सध्या तो कोणत्याही पोस्टमुळे नाही तर एका नेटकऱ्याला दिलेल्या उत्तरामुळे अधिक चर्चेत आला आहे. ओंकारने कोणाला उत्तर दिलं आहे? तसेच तो काय म्हणाला हे आपण आता जाणून घेऊया. (onkar raut viral post)

काल म्हणजे २५ डिसेंबर रोजी संपूर्ण जगभरात नाताळ साजरी करण्यात आली. यावेळी अनेक कलाकारांनी नाताळच्या हटके पद्धतीने शुभेच्छादेखील दिल्या. नाताळच्या सजावटीचे अनेक फोटोही शेअर केले. ओंकारनेदेखील फोटो शेअर करत सगळ्यांना नाताळच्या खास शुभेच्छा दिल्या. त्यावर अनेकांनी पसंतीदेखील दर्शवली आणि प्रतिक्रियादेखील दिल्या. मात्र एका प्रतिक्रियेने लक्ष वेधून घेतले. ओंकारने शेअर केलेल्या फोटोवर एकाने लिहिले होते की, “कधी आपल्या सणांच्या पोस्ट टाकल्या आहेत का भावा?”, त्यावर ओंकार उत्तर देत लिहिले की, “हो रे, मी जे सण साजरे करतो त्याचे फोटो कधी शेअर करतो तर कधी करत नाही. मुळात सण हा आनंद पसरवतो. त्यामध्ये हा सण आपला, तो सण त्यांचा अशी घाणेरडी वृत्ती नको”.

आणखी वाचा – Video : ख्रिसमसच्या दिवशी रणबीर कपूर व आलिया भट्टच्या लेकीने जिंकली मनं, पापाराझींना पाहून दिले फ्लाइंग किस, व्हिडीओ व्हायरल

पुढे त्याने लिहिले की, “मी लहानपणापासून गणपतीत मोदक खाल्ले आहेत, दिवाळीत फराळ, होळीला पूरणपोळी, ख्रिसमसला सांता क्लॉजकडून येणाऱ्या गिफ्टचीही वाट बघितली आहे. ईदला माहीमला जाऊन मालपोहे खाल्ले आहेत. प्रसन्नतेने गुढीपाडवा साजरा केला आहे तसेच मोठ्या उत्साहाने ३१ डिसेंबरही साजरी करतो. म्हणून हे असले प्रश्न परत कोणालाही विचारु नकोस. मेरी ख्रिसमस. सांता तुला गिफ्ट म्हणून सुविचार देवो”.   

आणखी वाचा – ‘आई कुठे…’ फेम अभिनेत्रीचा फिल्मी स्टाईल संगीत सोहळा, जबरदस्त डान्स, धमाल अन्…; Photo viral

दरम्यान ओंकारच्या या प्रतिक्रियेला लोकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. ओंकारच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर सध्या तो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये काम करताना दिसून येत आहे. त्याच्या विनोदी शैलीमुळे त्याचे मोठ्या प्रमाणात कौतुकदेखील केले जाते.  याआधीदेखील तो मराठीमध्ये काम करताना दिसून आला आहे.

Tags: christmas postmarathi actoronkar raut
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Niranjan Kulkarni Wedding Video
Entertainment

‘आई कुठे…’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याचं थाटामाटात लग्न, पारंपरिक पद्धतीने पार पडला विवाहसोहळा, लूकची चर्चा

जून 6, 2025 | 11:42 am
Priya bapat online shopping experience
Entertainment

प्रिया बापटला Blinkit ने पाठवला सडलेला कोबी, फोटोही केला शेअर, म्हणाली, “घाणेरड्या दर्जाच्या भाज्या…”

जून 6, 2025 | 11:07 am
muzammil ibrahim  On deepika padukone
Entertainment

तिने प्रपोज केलं, दोन वर्ष रिलेशनमध्ये होतो आणि…; दीपिका पदुकोणच्या पूर्वाश्रमीच्या बॉयफ्रेंडचा खुलासा, कोण आहे मुजम्म‍िल इब्राहिम?

जून 6, 2025 | 11:02 am
Hina Khan Wedding
Entertainment

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी कामावर परतली हिना खान, अगदी सिंपल लूकमध्ये दिसली, एकटी दिसताच नेटकरी म्हणाले, “नवरदेव कुठे आहे?”

जून 6, 2025 | 10:30 am
Next Post
hemant dhome social media post

हेमंत ढोमेच्या घरी नवीन पाहुण्याचे आगमन, फोटो शेअर करत दिली माहिती, म्हणाला, "नवीन सदस्य लक्ष्मी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.