बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर व अभिनेत्री आलिया भट्ट यांची लाडकी लेक राहा कपूर ही सध्या खूप चर्चेत असलेली बघायला मिळत आहे. गेल्या वर्षी नाताळच्या दिवशी या जोडीने राहाला पाहिल्यांदा मीडियासमोर आणले. यावेळी राहाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. नेटकऱ्यांनी राहाच्या सर्वच फोटोंवर प्रेमाचा वर्षाव केला होता. अनेकांनी तर राहाला बघितल्यानंतर दिवंगत अभिनेते व राहाचे आजोबा ऋषि कपूर यांच्यासारखी दिसत असल्याचे म्हंटले. त्यानंतर अनेकदा राहा तिच्या घरच्या मंडळींबरोबर स्पॉट झाली. अशातच आता पुन्हा एकदा नाताळ निमित्ताने स्टारकीडचा नवीन व्हिडिओ समोर आला आहे. (raha kapoor viral video)
राहा पुन्हा एकदा आई-वडिलांबरोबर दिसून आली. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये राहा रणबीरकडे असल्याचे दिसून येत आहे. मात्र राहाने केलेल्या कृतीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. रणबीर, आलिया व राहा एकत्रित ख्रिसमस पार्टीसाठी जाताना दिसून आले. राहाला हलक्या गुलाबी रंगाचा फ्रॉक परिधान करण्यात आला होता. यामध्ये ती खूपच गोड असलेली दिसून आली. राहा गाडीतून उतरण्याआधी आलियाने सर्व पापाराजीना आवाज कमी करण्याची विनंती केली. नंतर रणबीर राहाला घेऊन गाडीतून खाली उतरला. त्यानंतर लगेचच पापाराजीनी राहाला हॅलो बोलण्यास सुरुवाट केली. त्यानंतर रणबीरने राहाला काहीतरी सांगितले तेव्हा लगेच राहाने रणबीरला मिठी मारली.
नंतर राहा जेव्हा जाऊ लागली तेव्हा तिने पापाराजीना मोठ्याने हाय म्हंटलं आणि त्यांच्याकडे बघून फ्लाइंग किस देऊ लागली. राहाची ही गोड कृती कॅमेरामध्ये कैद झाली. तिच्या गोड वागण्याने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले. दरम्यान हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच सगळेच नेटकरी राहाचे कौतुकदेखील करताना दिसत आहेत.
प्रसिद्ध बॉलिवूड स्टार्स रणबीर कपूर व आलिया भट्ट यांची मुलगी राहा ही सर्वात प्रसिद्ध स्टार किड आहे. ती कुठेही गेली तरी तिची एक झलक पाहण्यासाठी पापाराझी आतुर असतात आणि राहाची छायाचित्रे सोशल मीडियावर येताच तिचे फोटो वाऱ्यासारखे पसरतात.