‘जबरदस्त’ चित्रपटामुळे अभिनेता पुष्कर जोग घराघरांत लोकप्रिय झाला. आजवर त्याने अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. ‘बिग बॉस’मराठी या शोमुळे पुष्करला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. ‘बिग बॉस मराठी’नंतर प्रसिद्धीझोतात आलेला पुष्कर हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय असतो. सोशल मीडियावर तो आपली अनेक मतं स्पष्टपणे मांडत असतो. सामाजिक, राजकीय तसंच सिनेसृष्टीतील विविध घडामोडींबद्दलही अनेकदा तो व्यक्त होत असतो. सोशल मीडियावर पुष्करचा बऱ्यापैकी वावर असून अनेकदा त्याच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा होत असते. (Pushkar Jog Instagram Story)
अशातच पुष्करने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरुन शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. पुष्करने ही पोस्ट शेअर केल्याने साऱ्यांच्या नजरा त्याच्या पोस्टकडे लागल्या आहेत. वैयक्तिक आयुष्यात आलेले चढ-उतार, काही कटू अनुभव आणि फसवणूक यामुळे त्रस्त असलेल्या पुष्करने ही पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत त्याने स्वतःच्या भावना व्यक्त केल्या आहेत. या पोस्टमधून त्याने त्याच्या मरणाबाबतही भाष्य केलं असून “मी गेल्यावर कुणी कुणी यायचं याची यादी देऊन जाईन” असं म्हटलं आहे. त्याचबरोबर “अजून १२ वर्षे आहेत” असं भाष्यही त्याने या पोस्टमधून केलं आहे.
आणखी वाचा – गणपती बाप्पासमोर लीला प्रेमाची कबुली देणार, लालबागच्या भरगर्दीत झालं शूट, मंडपात आली तेव्हा…
इन्स्टाग्रामवर स्टोरीद्वारे पुष्करने असं म्हटलं आहे की, सगळ्यांसाठी सगळं केलं. खरा वागलो. जेव्हा जेव्हा मानसिकरित्या खचतो तेव्हा आपले कोण कोण हे शोधतो. आई आणि मुलगी. नशिबवान आहेत ते सर्व ज्यांना काळजी घेणारे मित्र आहेत. जिवंत असताना एकटाच राहीन बहुतेक. मी गेल्यावर कुणी कुणी यायचं यांची यादी देऊन जाईन मी. उगाच किती वाईट वाटलं याचा आव आणून येऊ नका”.
आणखी वाचा – Deadpool & Wolverine आता ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज, कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या…
यापुढे पुष्करने असं म्हटलं आहे की, “अजून १२ वर्षे आहेत. राष्ट्रीय आणि ऑस्कर पुरस्कार जिंकायचा आहे. आई-बाबांसाठी लीजेंड (Legend) होऊनच जाईन, आई आणि फेलीशा तुमच्यावर खूप प्रेम आहे. त्या सर्वांना धन्यवाद ज्यांनी त्यांचे खरे रंग दाखवले”. दरम्यान, पुष्करने ही पोस्ट नक्की कुणाबद्दल केली आहे? हे सांगितले नाही. पण या पोस्टमुळे त्याने अनेकांना कोड्यात टाकले आहे.