मनोरंजन विश्वात सध्या आघाडीची मालिका म्हणजे आई कुठे काय करते नव्या विषयासह छोट्या पडद्यावर अवतरलेली मालिका दीर्घ काळापासून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात व्यस्त आहे. मालिकेतील अरुंधती या पात्रा भोवती फिरताना दिसतंय. एका लग्नानंतर महिलांना दुसरं लग्न करण्याचा अधिकार आहे का नाही या घटनांवर आधारित ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे.अनिरुद्ध सोबत मोडलेल्या लग्नानंतर अरुंधतीच्या आयुष्यात आशुतोष हा नवीन साथीदार म्हणून आला. (Yash Accident in AKKK)
गृहिणी असुदे की बाहेर काम करणारी स्त्री जिला जसा वेळ मिळेल, तशी ही मालिका बघितली जाते. दिवसेंदिवस या मालिकेचा चाहता वर्ग वाढताना दिसत आहे. अशातच मालिकेत अरुंधतीचा नवा संसार सुरु असताना तिच्या आयुष्यात घडणाऱ्या पुढच्या घटना तिला सुखावणाऱ्या आहेत कि दुखावणाऱ्या हे रेखाटण्यात आले आहे.
हे देखील वाचा- ईशा-अनिश पळून करणार लग्न? अरुंधती काय उचलणार पाऊल?
कथानकात पाहायला मिळतंय कि अभिषेकला त्याच्या चुकांची जाणीव होऊन तो पुन्हा अरुंधतीकडे येऊन तिची माफी मागतो तर दुसरीकडे इशा आणि अनिश पळून जाऊन लग्न करण्याच्या तयारीत दिसत आहेत. या मालिकेत अजून एक प्रेमी जोडपं असं आहे ज्यांच्यात सध्या दुरावा पाह्यला मिळतोय. अरुंधतीचा मुलगा यश आणि गौरी हे एकमेकांपासून दुरावल्याच चित्र आहे.

मालिकेच्या नुकताच दाखवण्यात आलेल्या प्रोमो मध्ये एक प्रेमी युगलाला पाहून यशला त्याच्या आणि गौरीच्या काही आठवणी आठवतात आणि तो त्या आठवणीत हरवून जातो. अरुंधती देवाकडे माझ्या तिन्ही मुलांना सुखी ठेव अशी प्रार्थना करते आणि त्यावेळी तिला यशचा अपघात झाला आहे असा भास होतो. नक्की यशचा अपघात झाला आहे का ? कि हा फक्त अरुंधतीचा भास आहे? आता यशच्या आयुष्यात गौरी पुन्हा येणार का? अरुंधती यशला कस सांभाळणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.(Yash Accident in AKKK)
हे देखील वाचा-ट्रेडिंग गाण्यावर गरबा केल्याने रेश्मा शिंदे झाली ट्रोल