शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मराठी कलाकारांची लगीनघाई, ‘आई कुठे…’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्याही केळवणाला सुरुवात, फोटोंनी वेधलं लक्ष

Shamal Sawantby Shamal Sawant
नोव्हेंबर 30, 2024 | 7:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
kaumudi walokar wedding

'आई कुठे काय करते?' फेम अभिनेत्री लवकरच अडकणार लग्नबंधनात

स्टार प्रवाहवरील प्रसिद्ध मालिका ‘आई कुठे काय करते?’ ही मालिका खूप लोकप्रिय आहे. पाच वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर आज म्हणजे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. अत्यंत रंजक वळणं या मालिकेमध्ये बघायला मिळाली. या मालिकेतील सर्वच पात्र प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहेत. दरम्यान या मालिकेमध्ये काही दिवसांपूर्वी आलेली अभिनेत्री आता पुन्हा एकदा मालिकेमुळे नाही तर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. ही अभिनेत्री म्हणजे कौमुदी वलोकर. कौमुदीने या मालिकेत आरोही ही भूमिका साकारली होती. खूप कमी काळात प्रेक्षकांनी तिला अधिक प्रेम दिलं आणि तिच्या भूमिकेला पसंतीदेखील दर्शवली. मालिका संपल्यावर मात्र आता तिच्याबद्दलची एक नवीन अपडेट समोर आली आहे. (kaumudi walokar wedding)

सध्या मनोरंजन क्षेत्रात सर्वत्र लगीन घाई सुरु आहे. मनोरंजन विश्वातील सोनाली गुरव-अभिषेक गांवकर, रेश्मा शिंदे-पवन या दमदार जोड्या लग्नबंधनात अडकल्या. आशातच आता कौमुदीदेखील लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. मागील वर्षी आकाश चौकसेबरोबर तिचा साखरपुडा पार पडला होता. त्यांच्या साखरपुड्याचे काही रोमॅंटिक फोटो व व्हिडीओदेखील  सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता लवकरच ही अभिनेत्री लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा सर्वत्र सुरु आहेत.

आणखी वाचा – शाहरुख खानच्या सहकलाकाराचा घाणेरडा कारभार,महिलेला चुकीचा स्पर्श व अश्लील भाषेत संवाद, पीडितेकडून मोठे खुलासे

View this post on Instagram

A post shared by Kaumudi Walokar (@kaumudiwalokar)

काही दिवसांपूर्वी तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर केळवणाचे काही फोटो शेअर केले होते. तिचे नातेवाईक व मित्रमंडळींनी तिच्यासाठी खास केळवण आयोजित केले होते. मात्र कौमुदीच्या लग्नाची तारीख अद्याप समोर आली नाही. मात्र सध्या सगळ्यांची लगीनघाई बघता लवकरच ती लग्नबंधनात अडकू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे.

आणखी वाचा – अमृता देशमुखने नवऱ्याच्या वाढदिवसाचं केलं ढिचँक सेलिब्रेशन, शेअर केले सगळ्यात गोड फोटो, म्हणाली, “रहना तू, है जैसा तू…”

कौमुदीच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर ‘आई कुठे…’ या मालिकेत तिने यशच्या पत्नीची भूमिका साकारली होती. या मालिकेतील अनघा व आरोही जावांची जोडीदेखील अधिक प्रसिद्ध झाली.कौमुदीने याआधी ‘मी वसंतराव’, ‘देवाशपथ’, ‘वायझेड’, ‘शटर’, ‘शाळा’, ‘तुझ्या मनात’ या चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.सोशल मीडियावरही तिचे अनेक चाहते आहेत. क्लिनिकल सायकॉलॉजीमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे.   

Tags: aai kuthe kaay karteaarohikaumudi walokar
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
01 december daily horoscope Income of Libra people will increase on Sunday while Capricorn people will get promotion in job

रविवारी तूळ राशीच्या लोकांचे उत्पन्न वाढेल तर मकर राशीच्या लोकांना नोकरीत बढती मिळेल, अधिक जाणून घ्या...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.