मराठी अभिनेता प्रसाद जवादे व अभिनेत्री अमृता देशमुख यांची जोडी अधिक चर्चेत राहिली आहे. १८ सप्टेंबर २०२३ रोजी हे दोघंही लग्नबंधनात अडकले. त्यांच्या लग्नासाठी मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकारदेखील उपस्थित राहिलेले बघायला मिळाले. लग्नानंतर त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर बघायला मिळाले. त्यांच्या सर्व फोटो व व्हिडीओना चाहत्यांची खूप पसंतीदेखील दर्शवली. त्यांचे अनेक मजा मस्करी करतानाचे व्हिडीओदेखील समोर येताना दिसतात. शेअर केलेल्या सर्व व्हिडीओ व फोटोंमध्ये दोघांमध्ये कमालीचे असणारे प्रेम प्रकर्षाने दिसून येते. अशातच आता अमृताने काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये प्रसादचा वाढदिवस साजरा करताना दिसत असून त्यांच्यामधील बॉंड बघायला मिळत आहे. (prasad jawade birthday celebration)
प्रसाद व अमृता हे दोघंही अक्षरश: एकमेकांवरुन जीव ओवाळून टाकतात. प्रत्येक दिवस ते आनंदाने साजरा करतात. तसेच एकमेकांसाठी काही ना काही स्पेशल करताना दिसतात. अशातच आता प्रसादच्या वाढदिवसानिमित्ताने काही फोटो अमृताने शेअर केले आहेत. शेअर केलेल्या फोटोंमध्ये प्रसाद वाढदिवसाचा केक कापताना दिसत आहे. तसेच त्याने मस्त अशी जोकर कॅपदेखील परिधान केलेली दिसून येत आहे. त्याचप्रमाणे एका फोटोमध्ये अमृता प्रसादच्या गालावर किस करतानाही दिसत आहे.
दुसऱ्या एका फोटोमध्ये केक भरवून झाल्यानंतर प्रसाददेखील अमृताला प्रेमाने गालावर किस करत आहे. हे फोटो शेअर करत अमृताने कॅप्शनमध्ये लिहिले की, “रहना तू..है जैसा तू..धीमा धीमा झोंका..या फिर जुनून, हॅपी बर्थडे जिगलीपफ” असे लिहून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान या फोटोंना चाहत्यांनी खूप पसंती दर्शवली आहे. तसेच वाढदिवसाच्या शुभेच्छादेखील दिल्या आहेत. अभिनेता पीयुष रानडे, तेजस्विनी लोणारी या कलाकारांनीही शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान दोघांच्याही कामाबद्दल बोलायचे झाले तर काही दिवसांपूर्वी अमृताला नाटक विश्वासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार मिळाला होता. तिच्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. सध्या अमृता तिच्या अभिनयाने रंगभूमी गाजवताना दिसत आहे. नाटकविश्वातील अमृताची कामगिरी पाहता तिला झी नाट्य गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्याचप्रमाणे प्रसाद हा ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ या मालिकेमध्ये मुख्य भूमिका साकारताना बघायला मिळत आहे. या मालिकेमध्ये तो आदित्य हे पात्र साकारत आहे. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षक खूप पसंत करत आहेत.