‘झी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘नवरी मिळे हिटलरला’ ही सध्या अधिक चर्चेत आहे. या मालिकेतील सर्वच भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. गेले नऊ महीने ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. खूप कमी कालावधीमध्ये या मालिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली आहे. यामध्ये राकेश बापट व वल्लरी विराज यांच्या मुख्य भूमिका बघायला मिळत आहेत. मालिकेमध्ये अभिराम जहागिरदार व लीला यांची अनपेक्षित प्रेमकहाणीदेखील बघायला मिळत आहे. या मालिकेमधील अनेक कलाकार सोशल मीडियावर सक्रिय असलेले दिसून येतात. तसेच ते सेटवरील धमाल मस्ती करतानाचे अनेक व्हिडीओदेखील सोशल मीडियावर बघायला मिळतात. (navri mile hitlerla kitchen tour)
‘नवरी मिळे…’ मालिकेतील जहागीरदारांच्या घराची नेहमी चर्चा असलेली बघायला मिळते. जहागीरदारांचा बंगला हा अधिक लक्ष वेधून घेतो. प्रशस्त खोल्या, सुंदर इंटीरियर, सजावट, प्राशस्त हॉल यामुळे घर अधिकच सुंदर दिसते. मालिकेमध्ये स्वयंपाक घर अधिक उठून दिसते. तर हे स्वयंपाक घर नेमकं कसं आहे? याबद्दल आपण जाणून घेऊया. घरातील सासू म्हणजेच लीला जहागीरदारने स्वयंपाक घराची सफर घडवली आहे. ‘इट्स मज्जा’बरोबर संवाद साधताना वल्लरी म्हणजेच लीलाने स्वयंपाक घर दाखवले आहे.
जहागीरदारांच्या घराबद्दल प्रेक्षकांना खूप उत्सुकता असते. हे घर नक्की कसं आहे? घरात काय आहे? असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडतात. त्यामुळे आता स्वयंपाक घर नक्की कसं आहे? याबद्दल आपण जाणून घेऊया. स्वयंपाक घरातील बेसिन आपल्याला बघायला मिळत आहे. मात्र हे केवळ चित्रीकरणासाठी असल्याने यातील नळाला पाणी येत नाही. तसेच मांडणीमध्ये ठेवलेल्या डाळी या सगळ्या खऱ्या आहेत. अनेकदा या डाळी वापरुन सेटवरच स्वयंपाकदेखील करण्यात येतो. तसेच गॅसवर नूडल्सदेखील बघायला मिळत आहेत. शर्मिला खूप छान जेवण बनवते त्यामुळे कधी कधी जेवण ती बनवते.
तसेच यावेळी लीला म्हणते की, “माझ्या घरातील स्वयंपाक घरही असच असावं, असं मला वाटत”. जहागीरदारांचं हे सुंदर सूटसुटीत स्वयंपाकघर प्रेक्षकांच्या अधिक पसंतीस पडत आहे. त्याचबरोबर मालिकेतील काही धमाल किस्से व पडद्यामागच्या काही रंजक कथाही शेअर करत असतात. अशातच मालिकेतील लीलाने तिच्या सोशल मीडियाद्वारे एक खास व्हिडीओ शेअर केला आहे आणि या व्हिडीओमधून तिने मालिकेचे शुटींग नेमके कसे केले जाते? याची खास झलक दाखवली आहे. मालिकेत बऱ्याचदा काही अपघाताचे सीन्स शूट केले जातात. याबद्दलचा एक व्हिडीओ वल्लरीने सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केला होता.