Rajkummar Rao baby news : बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव याने चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. लग्नाच्या चार वर्षानंतर राजकुमार वडील होणार आहे. यामुळे त्याच्या घरीही आनंद साजरा केला जात आहे. तो सध्या त्याच्या आगामी ‘मलिक’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट ११ जुलै रोजी चित्रपटगृहांमध्ये येईल. परंतु त्याआधी त्याने इन्स्टाग्रामवर गुडन्यूज शेअर करत साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. अभिनेत्याने सांगितले की तो वडील होणार आहे. आणि यासाठी तो खूप उत्साही आहे. त्याने आणि त्याच्या पत्नीने पत्रलेखा यांनी एका पोस्टच्या माध्यमातून या चांगल्या बातमीचे वर्णन केले आहे. ज्यावर सिनेविश्वातील सर्व मित्रांनी अभिनंदन केले आहे आणि चाहत्यांनीही प्रेम लुटले आहे.
नोव्हेंबर २०२१ मध्ये राजकुमार राव आणि पत्रलेखा यांनी लग्न केले. दोघांच्या वयामध्ये पाच वर्षाचा फरक आहे. जिथे अभिनेता ४० वर्षांचा आहे. तर अभिनेत्री ३५ वर्षांची आहे. आणि आता अफाट यशानंतर, तो वैयक्तिक आयुष्यात एक पाऊल पुढे सरकत आहे. इन्स्टाग्रामवर जोडप्याने लिहिलेल्या पोस्टमध्ये, “बाळ मार्गात आहे. आम्ही खूप उत्साही आहे”, असं म्हटलं आहे.
राजकुमार रावच्या पोस्टवर हुमा कुरैशी, जय सोनी, सोनाक्षी सिन्हा, नेहा धूपिया, उर्फी जावेद, भारती सिंह, नुसरत भारूचा, भूमि पेडनेकर, कियारा आडवाणी, रिद्धिमा कपूर साहनी, ताहिरा कश्यप, वरुण धवन, सोनम कपूर, विनीत कुमार सिंह, मानुषी छिल्लर, पुलकित सम्राट, ईशा गुप्ता, दिया मिर्जा, सुनीता राजवर यांनी हार्ट इमोजीसह आनंद आणि शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. याव्यतिरिक्त, फराह खान यांनी लिहिले, “शेवटी ही बातमी समोर आली. ते माझ्याकडे ठेवणे मला खूप अवघड झालं होतं. अभिनंदन”.
राजकुमार राव यांच्या ‘मलिक’ या चित्रपटात मानुशी छिल्लर पत्नीच्या भूमिकेत आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहून प्रत्येकाने अभिनेत्याचे कौतुक केले. कारण तो प्रथमच असे प्रचंड अॅक्शन सीन करताना दिसणार आहे. प्रत्येकाला त्याची अभिनयाची गडदता आणि तीव्रता आवडली आणि त्याला मोठ्या पडद्यावर पाहण्यास उत्सुक असल्याचं म्हटलं. यात हुमा कुरेशीचे आयटम सॉन्ग आहे, ज्यावर बरेच रील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.





