मज्जा डिजिटल पुरस्कारांची सध्या कलाक्षेत्रात चर्चा सुरु आहे. हे पुरस्कार कोणते कलाकार मंडळी पटकवणर याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिले आहे. अखेरीस ‘सहावा मज्जा डिजिटल पुरस्कारां’ची यादी जाहीर करण्यात आली आहे. ‘मीडिया वन सोल्युशन’ आणि ‘इट्स मज्जा’ प्रस्तुत ‘सहावा मज्जा डिजिटल पुरस्कारां’चा ग्रँड फिनाले आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. हे पुरस्कार तीन विभागात विभागले गेले आहेत. पहिला विभाग म्हणजे तांत्रिक विभाग, दुसरा विभाग म्हणजे मज्जेदार पुरस्कार, आणि तिसरा विभाग पॉप्युलर पुरस्कार. चला तर या विजेत्यांची संपूर्ण यादी पाहुयात.
वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी –
सर्वोत्कृष्ट बॅकग्राउंड स्कोर – शशांक पोवार (शिवप्रताप गरुडझेप)
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी – अमोल गोळे (पावनखिंड)
सर्वोत्कृष्ट वेषभूशा – सचिन लोवलेकर (मी वसंतराव)
सर्वोत्कृष्ट कथा – सलील कुलकर्णी (एकदा काय झालं)
सर्वोत्कृष्ट पटकथा – उपेंद्र सिद्धये व निपुण धर्माधिकारी (मी वसंतराव)
सर्वोत्कृष्ट संवाद – युवराज पाटील व अमोल कोल्हे (शिवप्रताप गरुडझेप)
सर्वोत्कृष्ट आर.जे – आर.जे अभिषेक (रेडिओ सिटी)
मज्जेदार कलाकार ऑफ द इयर अभिनेत्री – मुक्ता बर्वे (वाय)
मज्जेदार कलाकार ऑफ द इयर अभिनेता – अमोल कोल्हे (शिवप्रताप गरुडझेप)
मज्जेदार चित्रपट ऑफ द इयर – वाय
मज्जेदार तंत्रज्ञान ऑफ द इयर – निपुण धर्माधिकारी (मी वसंतराव)
सर्वोत्कृष्ट चित्रपट – धर्मवीर
सर्वोत्कृष्ट संगीत – अजय-अतुल (चंद्रमुखी)
सर्वोत्कृष्ट गीतकार – जितेंद्र जोशी (खळखळ गोदा – गोदावरी)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायन – अजय गोगावले (कान्हा – चंद्रमुखी)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका – आर्या आंबेकर (बाई गं – चंद्रमुखी)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – क्षितीश दाते (धर्मवीर)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – प्राजक्ता माळी (वाय)
सर्वोत्कृष्ट अभिनेता – प्रसाद ओक (धर्मवीर)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – हृता दुर्गुळे (अनन्या)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – प्रवीण तरडे (धर्मवीर)