मंगळवार, सप्टेंबर 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

नागराज मंजुळेंचं ओटीटी क्षेत्रात पदार्पण, ‘मटका किंग’ वेबसीरिजची घोषणा, मुख्य भूमिकेत दिसणार ‘हा’ अभिनेता

सौरभ जाधवby सौरभ जाधव
मार्च 20, 2024 | 1:08 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Nagraj Manjule New Web Series Matka King

Nagraj Manjule New Web Series Matka King

मराठी मनोरंजनसृष्टीत आपल्या हटके दिग्दर्शनाने नाव लौकिक मिळवणारे नागराज मंजुळे आता ओटीटी क्षेत्रात आपलं पदार्पण करत आहेत. यासंदर्भात अधिकृत घोषणा नुकतीच करण्यात आली. सध्या प्रेक्षकवर्ग मोठ्या प्रमाणात ओटीटी या माध्यमांवरील अनेक वेबसीरिज प्रामुख्याने पाहताना दिसतो. त्यामुळे चित्रपट, मालिका यांच्या तुलनेत वेगवेगळ्या वेब सीरिजची निर्मती मोठ्या प्रमाणात केली जाते. सैराट, नाळ अशा अनेक हिट चित्रपटांच्या निर्मिती नंतर दिग्दर्शक, निर्माते असणारे नागराज मंजुळे देखील आता ओटीटी क्षेत्राकडे आपली वाटचाल करताना पाहायला मिळत आहेत. ‘मटका किंग’ रतन खत्री यांच्या आयुष्यावर आधारित नागराज मंजुळे यांची ही नवीन वेबसीरिज असल्याचं सांगण्यात आलं आहे.( Nagraj Manjule New Web Series Matka King )

एका कार्यक्रमा दरम्यान नागराज मंजुळे यांनी ॲमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्म वर ‘मटका किंग’ ही वेबसीरिज आणणार असल्याचं सांगितलं. या वेब सीरिजमध्ये अभिनेता विजय वर्मा मुख्य भूमिकेत झळकणार असून आणखी प्रसिद्ध चेहरे देखील या वेबसीरिजमध्ये झळकणार असल्याच्या चर्चा आहेत. नागराज यांच्या या आगामी वेबसीरिजच्या निर्मितीची धुरा सिद्धार्थ रॉय कपूर यांच्या हाती असून लवकरच ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)


आणखी वाचा- समीर धर्माधिकारी यांची पत्नी कलाक्षेत्रामध्येच आहे कार्यरत, पहिल्यांदाच रिलेशनशिपबाबत केला खुलासा, म्हणाले, “आमचं लवकर लग्न झालं पण…”

नागराज मंजुळे यांचं दिगदर्शन आणि विजय वर्मा यांचा करारी अभिनय या वेबसीरिजमध्ये किती रंगत आणणार या बाबत चाहते उत्सुक दिसत आहेत. नागराज मंजुळे यांच्या या नवीन प्रोजेक्ट्च्या घोषणे नंतर त्यांच्या चाहत्यांमध्ये कमालीचा आनंद पाहायला मिळत आहे. आता नागराज मंजुळे आपल्या हटके दिग्दर्शन पद्धतीने या वेबसीरिजमध्ये कोणती नवीन गोष्ट आणणार हे पाहणं देखील रंजक ठरणार आहे. ( Nagraj Manjule New Web Series Matka King )

आणखी वाचा- “तुमचाच मुलगा आहे हे सिद्ध करा”, सिद्धू मुसेवालाच्या आईला मुलगा झाल्यानंतर पंजाब सरकारची विचित्र मागणी, गायकाचे वडील म्हणाले, “खूप त्रास…”

‘मटका किंग’ या वेबसीरिजमध्ये रतन खत्री ही मुख्य भूमिका अभिनेता विजय वर्मा साकारणार असून त्याने या आधी अनेक वेब सीरिजमध्ये वेगवेगळ्या भूमिका पार पाडल्या आहेत. तसेच मिर्जापूर या लोकप्रिय ठरलेल्या वेबसीरिजमध्ये देखील विजय मुख्य भूमिकेत दिसला होता. तसेच ‘मिर्जापूर ३’ या वेब सीरिजचीदेखील नुकतीच घोषणा करण्यात आली. त्यामुळे विजय वर्माच्या चाहत्यांना ‘मटका किंग’ व ‘मिर्जापूर ३’ या दोन्ही वेबसीरिजमध्ये विजयला पाहा येणार आहे.

Tags: ITSMAJJAmatka kingnagraj manjuleweb series
सौरभ जाधव

सौरभ जाधव

सौरभ जाधव, पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव. पत्रकारिकेचे शिक्षण गुरु नानक खालसा कॉलेज मधून पूर्ण केले असून पत्रकारिता क्षेत्रात पदव्युत्तर पदवी जोशी बेडेकर या कॉलेजमधून संपादन केली आहे. सुरुवातीला जनादेश वृत्तवाहिनी येथे काही काळ काम करून त्या नंतर कलाकृती मीडिया या डिजिटल पोर्टलला लेखक, सोशल मीडिया तसेच कॅमेरा विभागात देखील कामाचा अनुभव आहे. सध्या 'इट्स मज्जा' या पोर्टलमध्ये रिपोर्टर या पदावर कार्यरत आहे. कोणत्याही आवश्यक माहितीसाठी इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Next Post
actress Gauhar khan crying video

Video : १० महिन्याच्या मुलाला घेऊन उमरासाठी सौदी अरेबियामध्ये पोहोचली सुप्रसिद्ध अभिनेत्री, तिथेच ढसाढसा रडू लागली अन्…; व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.