मराठी सिनेविश्वात काही कलाकार मंडळी आजही अशी आहेत ज्यांनी सुरुवातीपासून आजवर सिनेसृष्टीत आपला तग धरून ठेवलाय. अशातच मराठी, हिंदी, तामिळ, तेलुगू अशा विविध भाषी सिनेविश्वात काम करणाऱ्या अजिंक्य देव यांचा विविध भाषी सिनेविश्वात चांगलाच वावर असलेला पाहायला मिळतोय. ६ फुटाहून अधिक उंच, भारदस्त व्यक्तिमत्व असलेल्या या अभिनेत्याने आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेतला. (Marathi Actor Lovestory)
बरं अजिंक्य देव यांच्या चित्रपटाबद्दल सर्वांनाच माहित आहे. मात्र त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार कमी जणांना माहित असेल. अजिंक्य देव यांची लव्हस्टोटी जरा जास्तच लक्षवेधक आहे. चला तर जाणून घेऊयात अजिंक्य देव आणि आरती देव यांच्या लव्हस्टोरीबद्दल. अजिंक्य देव आणि आरती यांची ओळख ही कॉलेजमधली. विले पार्ले येथील महाविद्यालयात ते दोघे शिकत होते. BSc च्या पहिल्या वर्षात असताना आरती आणि अजिंक्यची ओळख झाली. कॉलेजमध्ये असताना अजिंक्य यांना सगळे रमेश देव यांचा मुलगा म्हणून ओळखत होते. आरतीलाही अजिंक्यबाबत एकूण माहीत होत मात्र तशी ओळख नव्हती.
नेमकं काय घडलं आरतीला प्रपोज केल्यावर (Marathi Actor Lovestory)
अजिंक्यने ज्यावेळी आरतीला पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच तो तिच्या प्रेमात पडला. शिवाय अजिंक्य आणि आरती ट्रेकिंगच्या एकाच ग्रुपमध्ये होते. ट्रेकिंगला जाता येता त्यांची ओळख वाढली, आणि त्यांचं बोलणं सुरु झालं. आरती आवडत असल्याने तिला प्रपोज करायचे अजिंक्यने मनाशी पक्क केलं होत. अजिंक्य आरतीच्या प्रेमात होताच कधी ना कधी त्याला तिला प्रपोज करावे लागणारच होते. एकेदिवशी प्रपोज करायचं मनाशी त्याने पक्क केलं आणि जुहू बीचवर गाडी आडवी लावत त्याने थेट तिला मागणी घातली. प्रपोज करताच होकार येणार या संभ्रमात अजिंक्य होता, मात्र अजिंक्यने प्रपोज करताच आरतीला रडू आलं, आणि हे पाहून अजिंक्य यांना काही कळेनाच झालं.(Marathi Actor Lovestory)
त्यानंतर कॉलेजमध्येच दोघांनी एकमेकांना पसंत केलं आणि त्यांचं अफेअर सुरु झालं. त्यांनतर अजिंक्य यांचा सिनेविश्वातही प्रवास सुरु झाला. अजिंक्य सिनेविश्वात काम करतायत ही गोष्ट सुरुवातीला आरतीच्या कुटुंबियांना खटकली, मात्र आरतीने खंबीर पाऊल उचलत घरच्यांना समजावले.(Marathi Actor Lovestory)
अजिंक्य आणि आरती यांचं तरूणपणीचे गाजलेलं प्रेम आजही सुखाच्या ट्रॅकवर प्रवास करतंय. अजिंक्य आणि आरतीचा ३५ वर्षांहुन अधिक सुखाचा संसार सुरु असून त्यांना दोन मुलं आहेत. त्यातील त्यांची मुलगी ही ‘Special Child’ आहे. अजिंक्य आणि आरती या जोडप्याने स्पेशल चाईल्डसाठी शाळा देखील उघडली असून त्यांच्या विकासासाठी ते कार्यरत आहेत. आरती आणि अजिंक्य यांची ही लव्हस्टोरी आजही ऐकण्याजोगी आहे.
